मुंबई, जानेवारी २०२३: पर्यटन क्षेत्र पूर्वपदावर येत असताना भारतीय पर्यटक प्रजासत्ताक दिनासाठी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय गंतव्यांवर पर्यटनावर जाण्याप्रती रूची दाखवत आहेत आणि ही बाब कायकवर (KAYAK) विमानसेवा शोधांमध्ये झालेल्या वाढीमधून दिसून येते. प्रजासत्ताक दिनाच्या साप्ताहिक सुट्टीत सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या गंतव्यस्थानांमध्ये गोवा, मुंबई, नवी दिल्लीसह दुबई, बँकॉक आदी स्थानांचा समावेश आहे.
जगातील आघाडीच्या ट्रॅव्हल सर्च इंजिन कायकला प्रजासत्ताक दिनाच्या साप्ताहिक सुट्टी कालावधीसाठी विमानसेवा शोधांमध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली, जेथे २०१९ मध्ये याच सर्च कालावधीच्या तुलनेत देशांतर्गत रिटर्न विमानसेवा शोधांमध्ये जवळपास १८५ टक्क्यांची वाढ झाली, आशियासाठी विमानसेवा शोधांमध्ये जवळपास १२ टक्क्यांनी वाढ झाली आणि लांब अंतरापर्यंतच्या आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्क्यांनी वाढ झाली.
सर्व किंमती व सर्च डेटा २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२३ पर्यंतच्या प्रवासासाठी शोधांवर (१.११.२०२२ ते ०१.०१.२०२३) आधरित आहेत. याची तुलना २६ जानेवारी ते २९ जानेवारी २०२० पर्यंतच्या प्रवासासाठीच्या शोधांसोबत (०१.११.२०१९ ते ०१.०१.२०२०) करण्यात आली आहे.
कायक इंडियाचे कंट्री मॅनेजर तरूण तहीलियानी म्हणाले ‘‘प्रजासत्ताक दिनाच्या आसपास लाँग वीकेण्डचा उत्तम कालावधी भारतीयांना प्रवास करण्यास अत्यंत प्रेरणादायी आहे, जेथे प्रजासत्ताक दिनाच्या आसपास देशांतर्गत विमानसेवेमध्ये महामारीपूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा १८५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. आमच्या डेटामधून आंतरराष्ट्रीय विमानसेवा शोधांमध्ये जवळपास २४ टक्के वाढ झाल्याचे देखील निदर्शनास येते, ज्यामधून दिसून येते की भारतीयांनी लाँग वीकेण्डसाठी त्यांच्या लांब अंतरापर्यंतच्या ट्रिप्ससाठी स्मार्टपणे नियोजन केले आहे. कालावधीदरम्यान भारतीय पर्यटकांनी सर्वाधिक शोध घेतलेले गंतव्य आहेत गोवा, दुबई, नवी दिल्ली, मुंबई व बँकॉक. अजूनही नियोजन करत असलेल्यांसाठी कायकडॉटकोडॉटइनसारख्या वेबसाइट्स प्रबळ नियोजन साधने व वैशिष्ट्ये देतात, जी प्रवाशांना पैसे वाचवण्यास आणि स्थिर शोध फिल्टर, किंमत सूचना व किंमतीचा अंदाज साधने यांसारख्या गोष्टींसह आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेण्यास मदत करतात.’’
रिपब्लिक डे लाँग वीकेण्ड सर्च इनसाइट्समध्ये देशांतर्गत रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत –जवळपास १०,११३ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ४१ टक्के वाढ) असल्याचे दिसून आले. तसेच लांब अंतराच्या आंतरराष्ट्रीय रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत – जवळपास ७३,५७६ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ३२ टक्क्यांची वाढ) आहे. आशियाकरिता रिटर्न इकॉनॉमी फ्लाइटसाठी सरासरी किंमत – जवळपास २,८४६ रूपये (२०१९च्या तुलनेत जवळपास ३७ टक्क्यांची वाढ) आहे. ३ – ४ स्टार देशांतर्गत हॉटेलमधील वन नाइटसाठी सरासरी किंमत जवळपास ६,३०५ रूपये आहे.