मुंबई, २२ जानेवारी २०२३: एंजल वन लिमिटेडने ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीसाठी त्यांच्या लेखापरीक्षणपूर्व आर्थिक निकालांची घोषणा केली. एंजल वनने २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जवळपास १.० दशलक्ष ग्राहका वृद्धीची नोंद केली, ज्यामुळे तिमाहीदरम्यान एकूण ग्राहक संख्या १२.५ दशलक्षांपर्यंत पोहोचली. कंपनीचे एकत्रित एकूण उत्पन्न २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील ७,४५९ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये तिमाही-दर-तिमाही १.९ टक्के वाढीसह ७,५९७ दशलक्ष रूपयांवर पोहोचले. कंपनीच्या एकत्रित ईबीडीएटीमध्ये २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील २,९२६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीमध्ये तिमाही-दर-तिमाही ५.९ टक्के वाढीसह ३,०९९ दशलक्ष रुपयांची नोंद करण्यात आली. ईबीडीएटी मार्जिन (निव्वळ उत्पन्नाच्या टक्के) २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये ५३.९ टक्के राहिला.
कार्यरत असलेल्या कार्यसंचालनांमधून एकूण करोत्तर नफा २०२३ च्या दुसऱ्या तिमाहीमधील २,१३६ दशलक्ष रूपयांच्या तुलनेत २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये २,२८० दशलक्ष रूपये, ज्यामधून तिमाही-ते-तिमाही ६.८ टक्के वाढीची नोंद करण्यात आली. तिसरा हंगामी लाभांश म्हणून १० रुपये किमतीच्या प्रत्येक समभागासाठी ९.६० रुपये लाभांश देण्याची शिफारस संचालक मंडळाने केली आहे, हा लाभांश तिमाहीतील एकत्रित करोत्तर नफ्याच्या ३५ टक्क्यांशी समतुल्य आहे.
एंजल वनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. दिनेश ठक्कर म्हणाले, ‘‘दृढ आर्थिक धोरणांमुळे भारत जागतिक स्तरावर गुंतवणूकीचे सर्वोत्तम ठिकाण बनले आहे. यासह सतत विकसित होत असलेले नियामक वातावरण देशातील उच्च रिटेल सहभागासाठी प्रेरणास्रोत ठरले आहे. डिसेंबर २०२२ पर्यंत एकूण डिमॅट बेस १०८ दशलक्षांपेक्षा जास्त झाल्यामुळे भारताच्या भांडवली बाजाराने एक मैलाचा दगड स्थापित केला.
भारतातील तरुण लोकसंख्या तंत्रज्ञान आत्मसात करण्यास प्रबळ समर्थन देत आहे आणि एंजलची डिजिटल उत्पादने व प्रतिबद्धता साधने त्यांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी आम्हाला सुसज्ज करतात. आमच्या सुपर अॅपच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या संपत्ती निर्मितीच्या प्रवासात दीर्घकालीन सहयोगी बनण्याचा आणि त्यांच्या सर्व आर्थिक गरजा विस्तारित उत्पादन बकेटद्वारे पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या डिजिटल रणनीतीचे सकारात्मक परिणाम पाहून मला आनंद झाला आहे आणि या विस्तारत असलेल्या बाजारपेठेचा मोठा हिस्सा मिळवण्यासाठी आम्ही योग्य स्थितीत आहोत, असा माझा ठाम विश्वास आहे.’’
एंजल वनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.नारायण गंगाधर म्हणाले, ‘‘एंजल ही ११.६ टक्क्यांसह भागधारकांना १२ टक्के लाभांश देणारी एकूण डिमॅट खात्यांमध्ये मार्केट शेअर संपादित करणाऱ्या काही कंपन्यांपैकी एक आहे.
आमच्या लाभांश धोरणाशी बांधील राहत संचालक मंडाळाने कार्यात्मक आणि आर्थिक दोन्ही बाबतीत सातत्यपूर्ण वाढीची घोषणा केली आहे. एनएसई सक्रिय क्लायंटमध्ये तिसरा अंतरिम हिस्सा म्हणून आम्ही तिमाही नफ्याच्या ३५ टक्के वाटप करणे सुरू ठेवले आहे आणि भारतातील सर्वात मोठ्या आधुनिक डिजिटल ब्रोकर्समध्ये ठामपणे आहोत. स्थिर ऑर्डर आणि टर्नओव्हर मार्केट शेअरसह आमच्या सर्वोच्च त्रैमासिक एडीटीओची नोंद झाली. एंजल ही देशातील सर्वात मोठा सार्वजनिकरित्या व्यापार करणरी पूर्णपणे डिजिटल स्टॉक ब्रोकर आहे.
तिमाहीदरम्यान आम्ही आमच्या ग्राहकांच्या पहिल्या बॅचसाठी आमच्या सुपर अॅपचे अँड्रॉईड व्हर्जन सादर केले. या अॅपने १०० टक्के अपटाइमची नोंद केली, ज्यामुळे एकूण अनुभवामध्ये वाढ होण्यासोबत सर्वोत्तम प्लेस्टोअर रेटिंग व सर्वोच्च एनपीएस देखील मिळाले. आम्ही आयओएस, अँड्राईड आणि वेब व्यासपीठांवर म्युच्युअल फंड सेवा सुरू केल्या. हे अॅपचे ‘‘ट्रू सुपर अॅप’’मध्ये रूपांतर होण्याचे प्रतीक आहे. आमची उत्कृष्ट उत्पादन ऑफरिंग आणि दर्जात्मक ग्राहक अनुभवातील सर्वोत्तमता एंजलला आमच्या ग्राहकांसाठी एक विश्वासू भागीदार बनवते. मला विश्वास आहे की, आमचे अॅप उत्कृष्ट ग्राहक अनुभवाचे प्रतीक असेल आणि त्यांना विविध आर्थिक मालमत्तांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी सर्वात योग्य लॉन्चपॅड प्रदान करेल.’’