या उपक्रमातून महाराष्ट्रातील ११२ सरकारी शाळांमधील २०८०० पेक्षा जास्त विद्यार्थिनींना लाभ मिळेल
महाराष्ट्र, १७ जानेवारी २०२२– मास्टरकार्डने आज आपल्या खास गर्ल्स४टेक (Girls4Tech) स्टेम (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) शिक्षण उपक्रमांच्या भारतातील विस्ताराची घोषणा केली. मास्टरकार्ड इम्पॅक्ट फंडच्या (Mastercard Impact Fund) सहयोगाने आणि अमेरिकन इंडिया फाऊंडेशनच्या (एआयएफ) भागीदारीत या विस्तार उपक्रमाचे ध्येय २०२४ पर्यंत अतिरिक्त १ लाख विद्यार्थिनींपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना स्टेम शिक्षण घेण्यासाठी प्रेरित करण्याचे आहे. यात महाराष्ट्रातील २०,८०० विद्यार्थी आणि मुंबई तसेच नंदूरबार जिल्ह्यांमधील ११२ अतिरिक्त सरकारी शाळांमधील विद्यार्थी आहेत. येथे ८ ते १४ वर्षे वयोगटातील मुलींना स्टेम अभ्यासक्रम शिकवले जातील.
२०२०-२१ मध्ये हा उपक्रम भारतातील सहा राज्यांमधील नागरी तसेच ग्रामीण ठिकाणच्या ११२,४८२ मुलींपर्यंत पोहोचला. त्यात पुणे आणि मुंबई शहरांमधील १९,५४७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हे विषय देश आणि संस्थांसाठी विकासाचे पुढील टप्पे ठरत असले तरी या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लिंग तफावत आहे. ऑल इंडिया सर्व्हे ऑन हायर एज्युकेशन (एआयएसएचई) २०१९-२० नुसार भारतातील स्टेम पदवीधरांमध्ये महिलांची संख्या ४३ टक्के असतील तरी फक्त १४ टक्के महिला विद्यापीठे आणि संस्थांमध्ये वैज्ञानिक संशोधन करतात. मनुष्यबळातील कौशल्य तफावतीचा विचार करता ही परिस्थिती आणखी गंभीर बनते आणि त्यामुळे वैविध्यपूर्ण मनुष्यबळाला आकर्षित करणे, नेमणे आणि सहभागी करून घेण्याची आवश्यकता वाढते.
मुलींच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आव्हानांचा सामना करून त्यांचे स्वारस्य वाढवण्यासाठी मास्टरकार्डने अमेरिकन इंडिया फाऊंडेशनसोबत (एआयएफ) भागीदारी करून मुलींना स्टेम शिक्षण घेण्यासाठी आणि भविष्यासाठी नोकऱ्या निर्माण करून लिंगअसमानता कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
अमेरिकन इंडिया फाऊंडेशनचे राष्ट्रीय संचालक मॅथ्यू जोसेफ म्हणाले की, “स्टेममध्ये महिलांचे कमी प्रतिनिधीत्व व असमानता हे खोलवर रुजलेल्या सामाजिक पूर्वाग्रहांचे परिणाम व अपेक्षा आहेत, ज्यामुळे त्यांना मिळालेल्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर आणि त्यांनी अभ्यास केलेल्या विषयांवर परिणाम होतो. स्टेममध्ये महिला प्रमुख व रोल मॉडेल्सची कमतरता हा देखील एक अडथळा आहे आणि श्रमिक बाजारपेठेच्या यशामध्ये लैंगिक तफावत हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. अमेरिकन इंडिया फाऊंडेशन तरुण मुलींना स्टेम विषयांकडे आकर्षित करण्यावर लक्ष केंद्रित करणार्या उपायांसाठी कटिबद्ध आहे आणि गर्ल्स४टेक वरील मास्टरकार्डसह आमची भागीदारी याच दिशेने पाऊल आहे.’’
मास्टरकार्ड सेंटर फॉर इन्क्लुसिव्ह ग्रोथच्या आशिया पॅसिफिक विभागाच्या सामाजिक प्रभाव उपाध्यक्ष सुभाषिनी चंद्रन म्हणाल्या की, “जास्तीत जास्त महिलांची मनुष्यबळात आवश्यकता असली तरी त्यांना अनेक आव्हानांचा आणि विशेषतः भारताच्या निमशहरी आणि ग्रामीण भागांमध्ये सामना करावा लागतो. एक गोष्ट म्हणजे तंत्रज्ञानाच्या उद्योगात पुरूषांचे वर्चस्व आहे हा विचार आहे. त्यामुळे महिलांना शाळा किंवा विद्यापीठांमध्ये स्टेम अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले जात नाही. गर्ल्स४टेक उपक्रम जागतिक विज्ञान आणि गणित मानकांवर आधारित आहे आणि तो अभियंते आणि तंत्रज्ञ यांनी तयार केलेला आहे, त्याद्वारे मास्टरकार्ड तरूण मुली आणि महिलांना स्टेम शिक्षण घेऊन महिलांसाठी अधिक संधींच्या निर्मितीच्या सरकारी दृष्टीकोनाला पाठिंबा देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवते. त्यामुळे त्या भविष्यातील नोकऱ्यांसाठी सज्ज होतील.”
गर्ल्स४टेक™ हा २०१४ साली सुरू झालेला पुरस्कारविजेता शैक्षणिक उपक्रम आहे. त्याचे उद्दिष्ट भविष्यातील समस्या सोडवणारे विद्यार्थी निर्माण करणे, मास्टरकार्डच्या तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्णता या क्षेत्रांमधील सखोल ज्ञानाचा समावेश करणे हे आहे. या उपक्रमातून मुलींना फ्रॉड डिटेक्टिव्ह, डेटा सायंटिस्ट आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर यांच्यासारख्या विविध प्रकारच्या स्टेम करियर्सचा शोध घेण्यासाठी सज्ज करण्याचे ध्येय ठेवले गेले आहे.
मास्टरकार्डच्या २०१५ पासूनच्या “डुइंग वेल बाय डुइंग गुड” या मूल्यांनुसार ७०० पेक्षा अधिक मास्टरकार्ड कर्मचारी स्वयंसेवकांनी पुणे, वडोदरा, मुंबई आणि गुरूग्राम येथे विविध गर्ल्स४टेक कार्यक्रमांचे आयोजन केले आणि भारतभरात व्हर्चुअल सत्रे आयोजित करून ८-१६ वर्षे वयोगटातील ११०,००० विद्यार्थ्यांपर्यंत तो पोहोचला. कर्मचारी स्वयंसेवकांकडून प्रत्यक्ष, वैयक्तिक सत्रांच्या स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम तेव्हापासून उपक्रमाच्या ऑनलाइ स्त्रोतांद्वारे स्टेम अभ्यासक्रमात आपली व्याप्ती वाढवून जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे.
गर्ल्स४टेक कनेक्ट (Girls4Tech Connect) या वेबसाइटच्या माध्यमातून शिक्षक आणि पालक स्टेम विषयांबाबत विद्यार्थ्यांना शिकण्यास मदत करण्यासाठी धडे डाऊनलोड करू शकतात. त्यात एनक्रिप्शन, घोटाळा शोधणे, डेटा अॅनालिसिस आणि डिजिटल रूपांतरण या सर्व गोष्टी घर किंवा जगातून कुठूनही डाऊनलोड करता येतात. अभ्यासक्रमात एआय आणि सायबरसिक्युरिटी यांच्यासारखे विषय समाविष्ट आहेत आणि ते हिंदी, इंग्लिश, चायनीज, मलय, अरेबिक, स्पॅनिश, पोर्तुगीज, फ्रेंच आणि पोलिश भाषांमध्येही उपलब्ध आहेत.