नवी मुंबई, 17 जानेवारी २०२३ –* आशिया खंडातल्या सर्वात मोठ्या होम इम्प्रुव्हमेंट रिटेलर क्षेत्रातील MR. D.I.Y. या उद्योग साखळीची (१००) शंभरावे दुकान नवी मुंबईतील वाशी येथील इनऑर्बिट मॉलमध्ये सुरू झाले आहे.
MR. DIY चे शंभरावे वे दुकान या आठवड्यात सुरू होणे हे या कंपनीसाठी एक मैलाचा दगड आहे. नवी मुंबईमध्ये हे पाचवे दुकान आहे जे इनऑर्बिट मॉलमध्ये उघडण्यात आले आहे. MR. D.I.Y. ची भारतातील हे शंबरावे दुकान असून जगभरात या कंपनीच्या एकूण २,५०० पेक्षा अधिक दुकाने आहेत.
कंपनीच्या १०० व्या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, विविध क्षेत्रातील स्थानिक मान्यवर व शेकडो ग्राहक उपस्थित होते. या प्रसंगी MR. D.I.Y चे सीईओ मनीष शर्मा म्हणाले, कंपनीचे हे शंभरावे दुकान ग्राहकांसाठी खुले करताना आम्हाला अत्यंत आनंद होत असून हा टप्पा आमच्यासाठी मैलाचा दगड आहेच पण हे उद्दिष्ट्य आम्ही आमचे ग्राहक, कर्मचारी वर्ग व कंपनीतील भागीदारांच्या मदतीने साध्य केले आहे, याचे आम्हाला अतिशय समाधान लाभले आहे. यापुढे ग्राहकांना हव्या असलेल्या दैनंदिन, ‘सर्वात कमी दर’ व उत्तम दर्जाच्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी आमची कंपनी कटिबद्ध व प्रयत्नशील राहील याची ग्वाही देतो, असे श्री.मनीष शर्मा म्हणाले.
MR. D.I.Y हा ग्राहकांच्या आवडीचा ब्रँड असून घरगुती वस्तू, हार्डवेअर, इलेक्ट्रिकल, कार अक्सेसरीज, फर्निशिंग, स्टेशनरी, क्रीडा साहित्य, लहान मुलांची खेळणी, भेटवस्तू, कम्प्युटर अक्सेसरीज, फॅशन अक्सेसरीज व कॉस्मेटिक या १० प्रमुख प्रकारात १५ हजाराहून अधिक वस्तू (एसकेयू) विक्रीस आहेत. प्रत्येक ग्राहकाला अत्यावश्यक असणारी वस्तू MR. D.I.Y मध्ये मिळते. शिवाय प्रत्येक कुटुंबाला MR. D.I.Y मध्ये खरेदी करण्याचा आनंद मिळतो. ग्राहकाचे जीवनमान व त्यांची जीवनशैली सुधारण्यासाठी आमचे अव्याहत प्रयत्न असतात, असेही श्री. मनिष शर्मा म्हणाले.
प्रत्येक भारतीय व्यक्तीला स्वयंपूर्ण, स्वतंत्र, पर्यावरण व प्राणीमात्रांवर प्रेम करत कुटुंबासोबत आनंदात राहायला आवडते. भारतीय माणसाची ही मूल्ये आम्हाला अधिक प्रेरित करत असतात. प्रत्येक भारतीय कुटुंबाचे जगणे अधिक समृद्ध करणे, त्याने समाजाचीही प्रगती होती हे आमचे ध्येय आहे. त्यासाठी MR. D.I.Y. ग्राहकांचे सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत असते. आम्हाला प्रत्येक भारतीय कुटुंबातील व्यक्तीच्या आनंदाचा व समाधानाचा भाग बनायचा आहे, असे श्री. मनीश शर्मा म्हणाले. मुंबईतील आमच्या कंपनीच्या पहिल्या शाखेपासून ग्राहकांचे प्रेम आमच्यावर आहेच पण त्याचा आमच्यावर विश्वास व आम्हाला पाठिंबाही आहे, हे या निमित्ताने आम्हाला अधोरेखित करायचे आहे. त्याबद्दल आम्ही आभारी आहोत. ग्राहकांच्या समाधानाच्या दृष्टिकोनामुळे आम्हाला सतत काम करण्याची प्रेरणा मिळते. प्रत्येक उत्पादनातून नवनवा अनुभव मिळतो व एकेक मैलाचा दगड आम्ही पार करत जात आहोत. केवळ आणि केवळ ग्राहकांमुळे आम्ही भारतात आजपर्यंत कार्यरत आहोत व आमच्या व्यवसायाचा विस्तार करू शकलो आहोत.
MR. D.I.Y च्या १०० व्या दुकानाच्या निमित्ताने आम्ही मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम साजरा करत आहोत. यावेळी वेगवेगळ्या प्रोमोशन सोबत काही वस्तूंचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येईल. ग्राहकांना या निमित्ताने ८०० रु. किमतीच्या कोणत्याही वस्तूंच्या खरेदीमागे आम्ही मोफत छत्र्या/ बाटल्या देणार आहोत.
प्रत्येक ग्राहकाची गरज लक्षात घेऊन त्याला कमीत कमी, खिशाला परवडतील व त्याच्या पैशाची वसुली होईल आणि समाधानही लाभेल अशा दरात घरगुती वापराच्या वस्तू देणे हे आमचे आश्वासन आहे. यासाठी लवकरच देशात विविध शहरांमध्ये MR. D.I.Y ची नवी दुकाने सुरू केली जाणार आहे. ‘अत्यंत कमी दरात वस्तू’ हेच ब्रीद घेऊन आम्ही आमच्या उत्पादनात नवेपणा आणू आणि आपली घरे व जीवनशैली सुधारण्याचा आमचा प्रयत्न यापुढे कायम राहील.