“गोडसे एका दिवसात बनता येतं, पण गांधी…” जबरदस्त डायलॉग, दर्जेदार अभिनय;
मुंबई : राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे- एक युद्ध’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून नथुराम गोडसे यांच्या भूमिकेत कोणता अभिनेता दिसणार हे स्पष्ट झाले आहे.
गांधी गोडसे या चित्रपटाच्या ३ मिनिटे १० सेकंदाच्या ट्रेलरमध्ये महात्मा गांधी आणि नुथराम गोडसे यांच्या विचारधारेतील युद्धाची झलक पाहायला मिळाली. सोबतच स्वातंत्र्यानंतरच्या राजकारणाचे रुप चित्रपटात दाखवण्यात आले आहे. अभिनेता दीपक अंतानी या चित्रपटात महत्मा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता चिन्मय मांडलेकर गोडसेंची भूमिका साकारणार आहे. एकंदरीत चित्रपटाचा ट्रेलर हा अंगावर काटा आणणारा आहे.
गांधी वधाचा सीननंतर नथुरामला अटक होऊन तो तुरुंगात दाखवण्यात आला आहे. मात्र यात एक वेगळा प्रयोग केला गेला आहे तो म्हणजे नथुराम आणि गांधी यांच्यातील वैचारिक मतभेद दाखवले आहेत. या चित्रपटात ते एकमेकांसमोर आपले विचार मांडताना दाखवले आहेत. म्हणूनच या चित्रपटाला एक वैचारिक युद्ध म्हणून सादर करण्यात आलं आहे.
राजकुमार संतोषी दिग्दर्शित गांधी गोडसे हा चित्रपट २६ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा जोरदार टेलर प्रर्दशित झाल्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट किती चालतो हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.
लिंक