NHI NEWS AGENCY/REPORTER/ ANAGHA SANTOSH
मुंबई, 20 ऑक्टोबर २०२४: सीडीएसएल इनव्हेस्टर प्रोटेक्शन फंड (CDSL IPF) ला 2024 चा जागतिक गुंतवणूकदार सप्ताह (डब्ल्यूआयडब्ल्यू) साजरा करत असल्याची घोषणा करताना आनंद होत आहे. इंटरनॅशनल ऑर्गनाइज़ेशन ऑफ सिक्युरिटीज कमिशन्स (IOSCO) आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) यांच्या नेतृत्वाखाली हा सप्ताह आयोजित केला गेला आहे.
जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाचा भाग म्हणून, सीडीएसएल आयपीएफने सुरक्षित गुंतवणूक आणि फसवणूक तसेच घोटाळा प्रतिबंध याबद्दल जनजागृती करण्यासाठी सायकल फेरीचे आयोजन केले. ही सायकल रॅली एचआर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स आणि क्रिशा फाऊंडेशन तसेच विविध सायकलिंग गटांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमात २०० हून अधिक जण सहभागी झाले होते.
‘स्लॅम द स्कॅम्स’ मोहिमेअंतर्गत गुंतवणूकदार जागरूकता कार्यक्रमांची मालिका तसेच गुंतवणूकदारांना फसवणूक आणि घोटाळा प्रतिबंधाच्या जागरूकतेसाठी व्यावहारिक ज्ञान आणि साधने पुरविण्यासाठी विविध उपक्रमांचा समावेश असेल.
सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेहाल वोरा म्हणाले, “’स्लॅम द स्कॅम्स’ मोहिम जागतिक गुंतवणूकदार सप्ताहाच्या फसवणूक आणि घोटाळा प्रतिबंधाच्या मुख्य संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत आहे. गुंतवणूकदार शिक्षण आणि आर्थिक साक्षरता कधी नव्हे एवढी महत्त्वाची ठरत असताना, आम्ही गुंतवणूकदारांना फसवणूक आणि घोटाळ्यांबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी जागरूकता वाढविण्याकरता समर्पित आहोत. सीडीएसएलमध्ये, आम्ही आमच्या आर्थिक परिसंस्थेवरील विश्वास मजबूत करण्यासाठी, व्यक्तींना आत्मनिर्भर गुंतवणूकदार होण्यासाठी सक्षम करण्याकरता आणि भारताच्या आर्थिक विकासात आत्मविश्वासाने सहभाग घेण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
जागतिक गुंतवणूकदार सप्ताह या वर्षी भारतात सोमवार, १४ ऑक्टोबर ते रविवार २० ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा केला जात आहे. सिक्युरिटीज मार्केट नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) हे याचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.