मुंबई दि.१०: महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष,माजी आमदार,इंटक एसटी कामगारनेते जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने एक तळमळीने कार्य करणारे, गांधीवादी नेते हरपले,अशा भावपूर्ण शब्दांत राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, माजी राज्यमंत्री सचिनभाऊ अहिर तसेच महाराष्ट्र इंटकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिवंगत नेत्याला श्रध्दांजली वाहिली आहे.
महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांचे रात्री नाशिक येथे आकस्मित निधन झाले (७५).इंटक तसेच कॉग्रेसमध्ये प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या नेत्याच्या आकस्मित निधना बद्दल महाराष्ट्रात कामगार वर्गात सर्वत्र शोककळा उमटून आलेली दिसते.
जयप्रकाश छाजेड यांच्या दु:खद निधनाबद्दल राष्ट्रीय मिल मजदूर संघआणि महाराष्ट्र इंटकच्या वतीने श्रध्दांजली वाहातांना सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी म्हटले आहे, त्यांनी इंटकला बळ देत असतानाच कॉग्रेसचा गांधीवादी विचार जोपासला. त्यांच्या निधनाने कामगार चळवळीचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे, असे सचिन भाऊअहिर आणि गोविंदराव मोहिते यांनी शेवटी म्हटले आहे.***