NHI NEWS AGENCY /REPORTER/ ANAGHA SAKPAL
– प्रसिद्ध दिग्दर्शक लीना यादव आणि मान्यवर सिने छायाचित्रणकार असीम बजाज यांच्या उपस्थितीत ‘लॉंच’ झाली डुवो मालिकेतली पहिली वाइड झूम लेन्स देते ब्रॉडकास्ट लेन्स च्या सहज वापरासह आश्चर्य कारक ‘बोके इफेक्ट’
– 14mm वाइड अॅंगल ते 100mm मिड टेलिफोटो अशी बहुगुणी क्षमता, आटोपशीर आकार आणि कमी वजन ( 266.9 मिमी लांबी आणि 2.54 किलो वजन ) यामुळे कोठेही घेऊन जाणे सुलभ
– ड्युएल फॉरमॅट क्षमतेमुळे सुपर Super 35mm आणि फुल फ्रेम सेन्सर चा सलग वापर शक्य
मुंबई, 17 ऑक्टोबर 2024 : प्रक्षेपण, सिने चित्रण आणि इलेक्ट्रोनिक इमेजिंग यासाठीची भिंगे (लेन्स ) यांचे उत्पादन करणा-या FUJIFILM इंडिया ने FUJINON HZK14-100mm – ‘डुवो पोर्टेबल ’ ही लेन्स ब्रॉड कास्ट इंडिया च्या ३३ व्या अधिवेशनात सादर झाल्याची घोषणा केली आहे. डुवो मालिकेतली ही FUJINON HZK25-1000mm आणि FUJINON HZK24-300mm नंतरची तिसरी आणि वाइड झूम मधील पहिली लेन्स आहे.
चित्रपटाच्या दर्जाचे छायाचित्रण शक्य करतानाच ब्रॉडकास्ट लेन्स ची सुलभता राखणारी ही लेन्स चित्रपट निर्माते आणि दृक प्रक्षेपण व्यावसायिकांसाठी उपयुक्त ठरेल. प्रतिमेची गुणवत्ता आणि वापरातली व्यवहार्यता यांमध्ये समतोल राखत FUJINON HZK14-100mm विविध दृश्यनिर्मिती साठीचे एक अत्यंत उपयुक्त साधन ठरेल.
FUJINON HZK14-100mm ही एक आटोपशीर लेन्स असून लार्ज इमेज सेन्सर शी सुसंगत अशी तिची रचना आहे. ती Super 35 मध्ये 7.1x झूम सह 14-100mm फोकल लेंग्थ मिळवून देते. अंतर्भूत 1.5x एक्सपांडर मुळे तिची व्याप्ती 21-150mm पर्यन्त वाढू शकते ज्यामुळे , लार्ज फॉरमॅट कॅमेरा मध्ये 16:9 या प्रमाणात कव्हरेज मिळू शकते. या लेन्स चे वजन फक्त 2.54 किलो आणि लांबी 266.9mm मिमी असल्यामुळे , डुवो मालिकेतली ती वाहून नेण्यासाठी सर्वात सुलभ लेन्स आहे. प्रगत वैशिष्ट्यांच्या आणि सुपर इ डी च्या आधारे ही लेन्स चित्रपटाच्या दर्जाचे छायाचित्रण करण्यास सज्ज आहे. या लेन्स चे कार्य प्रक्षेपण शैलीचे आहे आणि ती अन्य सिनेमा उपकरणांशी जोडली जाऊ शकत असल्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या दोन्हीसाठी तिचा फायदा होतो. FUJINON HZK14-100mm मध्ये अनेक प्रगत वैशिष्ट्यांचा अंतर्भाव आहे त्यामुळे प्रक्षेपण आणि चित्रपट निर्मिती या बाबतीत ती वरचढ ठरते. चित्रपटसारखी दृश्ये टिपण्याची ताकद असल्यामुळे ही लेन्स अचूक काम करते आणि T2.9 या अपरचर ला सुद्धा आश्चर्य कारक ‘बोके इफेक्ट’ मिळवून देते.
प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक लीना यादव म्हणाल्या, “प्रेक्षकांची अभिरुचि विकसित होत असल्यामुळे चित्रपट हे कलामाध्यम अधिक परिपक्व होत आहे आणि चित्रपटकर्त्यांसाठी कला स्वातंत्र्याची नवी दारे खुली होत आहेत. मला Fujinon 14-100mm Duvo ही लेन्स माझ्या कल्पकतेला पोषक वाटते. इथे जमलेल्या तज्ज्ञांचे विचार ऐकल्यावर मला असे वाटते की या लेन्स मुळे मला मंद प्रकाशात अधिक व्यापक परिसर टिपता येईल. या मालिकेतील लेन्स भारतीय चित्रपट उद्योगाच्या निर्मितीकौशल्याला बळ देतील अशी मला खात्री आहे.
मान्यवर सिने छायाचित्रणकार असीम बजाज यांनी FUJIFILM च्या लेन्स च्या बहुगुणी स्वरूपाची नोंद केली आणि “बिकमिंग” या त्यांच्या चित्रपटाच्या चित्रणात फुजिनॉन प्रेमीस्टा (19-45mm; 28-100mm; 80-250mm) लेन्स चा कसा फायदा झाला ते सांगितले. “ फुजिनॉन चा वापर केल्यामुळे प्रतिमेची गुणवत्ता आणि खोली कमालीची सुधारली. फुजिनॉन लेन्स आणि GFX सीरिज यांच्या अबाधित कामामुळे आणि थक्क करणारी बारकावे टिपण्याची ताकद मिळाल्यामुळे मला ‘बिकमिंग’ चा आत्मा नेमकेपणाने, उत्तम रंगसंगतीने साध्य झाला. नव्या डुवो मालिकेतील 14-100mm उत्तम कामगिरी करील अशी मला खात्री आहे. या लेन्स च्या वैशिष्ट्यांमुळे प्रतिमा चित्रणाचे विश्वच बदलेल आणि मंद प्रकाशातील चित्रण अधिक उठावदार होईल. या लेन्स चा लवकर वापर करण्यास मी उत्सुक आहे.
FUJIFILM इंडिया चे व्यवस्थापकीय संचालक श्री कोजी वादा म्हणाले, “ FUJIFILM इंडिया नवनवीन उत्पादने आणि प्रणाली निर्माण करणे त्यातून ग्राहकाचा अधिकाधिक फायदा करून देणे यासाठी वचनबद्ध आहे. वैविध्यपूर्ण कल्पना, विशेष क्षमता आणि असाधारण कर्मचारीवर्ग या आधारावर आम्ही जगभरातल्या प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य उमटवण्याचा प्रयत्न करतो. नवीन FUJINON HZK14-100mm लेन्स मधून आमचे हे प्रयत्न अधोरेखित होतात आणि प्रक्षेपण क्षेत्रातील व्यावसायिकांना भरपूर मोकळीक आणि गुणवत्ता मिळू शकते ज्यामुळे ते विविध वातावरणात उत्तम कामगिरी दाखवू शकतात. ”
FUJIFILM इंडिया विषयी :
वर्ष २००७ मध्ये स्थापन झालेली FUJIFILM इंडिया ही फुजीफिल्म होल्डिंग्ज कॉर्पोरेशन टोक्यो ची पूर्ण स्वामित्वाची कंपनी आहे. फुजीफिल्म इंडिया स्वास्थ्य सेवा, इलेक्ट्रॉनिक्स, बिझनेस इनोव्हशन आणि इमेजिंग या चार व्यवसायात काम करते. कंपनीकडे तंत्रदृष्ट्या प्रगत उत्पादनांची मोठी मालिका आहे. स्वास्थ्यसेवा , एंडोस्कोपी सिस्टिम्स , फोटो इमेजिंग सोल्युशन्स , इन्स्टंट फोटो सिस्टिम्स, ऑप्टिकल डिव्हाईसेस , ग्राफिक कम्युनिकेशन सोल्युशन्स, मल्टि फंक्शन प्रिंटर , रेकॉर्डिंग मीडिया आणि इंडस्ट्रियल प्रॉडक्ट असा कंपनीचा व्यवसाय आहे. अधिक माहितीसाठी कृपया https://www.fujifilm.com/in/en येथे भेट द्या.