दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीत बसलेल्या आरोपींनी कबुली दिली आहे की, घटनेनंतर काही वेळातच मुलीचा मृतदेह वाहनात अडकल्याची माहिती त्यांना मिळाली होती. पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, आरोपींना मृतदेह बाहेर काढताना पाहिले तर आपण अडकून पडू शकतो, या भीतीने त्यांनी मृतदेह बाहेर काढला नाही.

म्हणजेच या आरोपींना त्यांच्या गाडीत एक मृतदेह लटकत असल्याची कल्पना होती. त्यानंतर आरोपींनी या प्रकरणात अडकण्याच्या भीतीने मृतदेह कित्येक किलोमीटरपर्यंत ओढून नेला. आरोपींनी स्वतः पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे. आतापर्यंत या प्रकरणात अचानक असे खुलासे होत आहेत, त्यामुळे लोकांचा रोष वाढत आहे.
कांजवाला अपघात प्रकरणातील आरोपींचा बचाव करणाऱ्या अंकुश खन्ना याला दिल्ली न्यायालयाने शनिवारी जामीन मंजूर केला. महानगर दंडाधिकारी सान्या दलाल यांनी शरणागती पत्करलेल्या खन्ना यांना जामीन मंजूर केला. त्यांच्यावरील आरोप जामीनपात्र असल्याचे निरीक्षण नोंदवून आरोपीला 20,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
दरम्यान, 31 डिसेंबर रोजी रात्री कांजवालाच्या रस्त्यावर जी घटना घडली ती अतिशय वेदनादायी होती. रविवारी रात्री अंजली एका कार्यक्रमातून आपल्या स्कूटीवरून घरी परतत होती. त्यानंतर तिचा अपघात झाला आणि आरोपी मृतदेहाला लटकवून सुमारे 12 किलोमीटर कार चालवत राहिले. आता आरोपींनीही कबुली दिली आहे की, त्यांना कारमध्ये लटकलेल्या मृतदेहाची आधीच माहिती होती.