छत्तीसगड : अग्निवीर योजनेत निवड होणारी हिशा बघेल ही देशातील पहिली महिला ठरली आहे. ती छत्तीसगड येथील दुर्ग येथील राहणारी आहे. ती लवकरच सशस्त्र सेवेत सामील होईल. ती बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकत होती. तिची निवड झाल्याने तिच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
आई म्हणते – मला खूप अभिमान
एएनआयशी बोलताना हिशाची आईने सांगितलं की, ‘मला खूप अभिमान आहे. ती खूप मेहनती आहे आणि प्रशिक्षणासाठी ती पहाटे ४ वाजता उठायची. कर्करोगाने त्रस्त असलेल्या माझ्या पतीच्या उपचारासाठी आम्ही आमची जमीन आणि रिक्षा विकली. आम्ही आमच्या मुलांनाही शिकवतो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हिशा छत्तीसगडची पहिली अग्निवीर बनणार आहे’.
बीएससी द्वितीय वर्षात अग्निवीर म्हणून निवड
आमच्या शाळेतील एका विद्यार्थिनीची पहिली महिला अग्निवीर म्हणून निवड झाली आहे हे जाणून आम्हाला खूप आनंद झाला. ती खूप हुशार विद्यार्थिनी आहे. ती खेळातही चांगली आहे. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब असूनही ती हे करू शकली, असं हिशाच्या शाळेतील शिक्षिकेने सांगितलं. हिशाची या योजनेसाठी निवड झाली तेव्हा ती बी.एस्सी.च्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती.
ओदिशात प्रशिक्षण सुरु
हिशा सध्या ओदिशातील चिल्का येथे भारतीय नौदलातील वरिष्ठ माध्यमिक भरतीसाठी प्रशिक्षण घेत आहे. मार्चपर्यंत तिचे प्रशिक्षण सुरू राहणार असून त्यानंतर ती देशाच्या सुरक्षेसाठी सज्ज होईल.
गेल्या वर्षी १४ जून २०२२ रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय तरुणांना सैन्य दलात सेवा देण्यासाठी ‘अग्निपथ’ या भरती योजनेला मंजुरी दिली. योजनेंतर्गत निवड झालेल्या तरुणांना ‘अग्नवीर’ म्हणून ओळखले जाईल आणि त्यांना कायमस्वरूपी केडरमध्ये नावनोंदणीसाठी अर्ज करण्याची संधी दिली जाईल.