मुंबई: एसव्हीकेएम’च्या नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS), 41 वर्षांचा शैक्षणिक वारसा असलेले डीम्ड-टू-बी विद्यापीठ असून त्यांच्या वतीने इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी), फार्मास्यूटीकल्स (औषधनिर्मिती), कॉमर्स (वाणिज्य), इकनॉमिक्स (अर्थशास्त्र), लिबरल आर्ट्स, ब्रँडिंग अँड अॅडव्हर्टायजिंग, इंटरनॅशनल स्टडीज, आंत्रप्रेन्योरशिप अँड फॅमिली बिझनेस तसेच लॉ विषयक एनएमआयएमएस-सीईटी, एनपीएटी आणि एलएटी प्रवेश परीक्षांसाठी नोंदणीला 1 डिसेंबर 2022 पासून सुरू झाली आहे.
इंजिनिअरिंग (अभियांत्रिकी), टेक्नोलॉजी मॅनेजमेंट (तंत्रज्ञान व्यवस्थापन), फार्मसी (औषधनिर्मिती) आणि फार्मा मॅनेजमेंट क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या पदवी-पूर्व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एनएमआयएमएस-सीईटी हा प्रवेश मार्ग आहे.
एनएमआयएमएस-सीईटी अंतर्गत येणारे अभ्यास कार्यक्रम म्हणजे मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग (MPSTME) मुंबई आणि शिरपूर, आणि द स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अँड इंजिनिअरिंग (STME) च्या नवी मुंबई, इंदूर, हैदराबाद आणि चंदीगड कॅम्पसमध्ये बी टेक (4 वर्षे), integrated बी टेक + एमबीए टेक (5 वर्षे) आणि integrated बी फार्म + एमबीए (5 वर्षे) याप्रमाणे आहेत.
शोभाबेन प्रतापभाई पटेल स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (SPPSPTM), मुंबई आणि स्कूल ऑफ फार्मसी अँड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट (SPTM), शिरपूर व हैदराबाद कॅम्पस येथे बी. फार्म + एमबीए (फार्मा. टेक.), 5 वर्षांचा ड्युएल-डिग्री प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात येतो.
NMIMS-LAT – NMIMS LAT 2023 ही 5 वर्षांच्या बी. ए. प्रवेशासाठी घेण्यात येणारी कायद्याशी संबंधित प्रवेश परीक्षा आहे. एलएल.बी. (ऑनर्स) आणि बी.बी.ए. एलएल.बी. (ऑनर्स) कार्यक्रम एसकेव्हीएम एनएमआयएमएस’च्या किरीट पी मेहता स्कूल ऑफ लॉ, मुंबई आणि स्कूल ऑफ लॉ, नवी मुंबई, बेंगळुरू, इंदूर, हैदराबाद आणि चंदीगड कॅम्पस येथे आयोजित करण्यात आले आहेत. किरीट पी. मेहता स्कूल ऑफ लॉची स्थापना 2013 मध्ये झाली व बार कौन्सिल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. स्कूल ऑफ लॉ’ने अनन्यपणे अनिवार्य क्रेडिट-आधारित इंटर्नशिप आणि मूट कोर्टचा विषय म्हणून समावेश केला आहे. कॉर्पोरेट जगताशी विद्यार्थ्यांच्या परस्परसंवादाची काळजी घेत शाळेने एक पूर्णतः कार्यशील लीगल एड क्लिनिक आणि प्लेसमेंट सपोर्ट टीम देखील तयार केली आहे.
NMIMS- NPAT – NMIMS नॅशनल टेस्ट फॉर प्रोग्रॅम्स आफ्टर ट्वेल्थ (NPAT) 2023 ही कॅम्पसमध्ये अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्सच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आहे.
अंडरग्रॅज्यूएट डिग्री प्रोग्राम (पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम)साठी प्रवेश परीक्षा:
● BBA, B.Sc. फायनान्स आणि बी.कॉम. (ऑनर्स) अनिल सुरेंद्र मोदी स्कूल ऑफ कॉमर्स, मुंबई आणि स्कूल ऑफ कॉमर्स हैदराबाद, नवी मुंबई, धुळे, चंदीगड, बेंगळुरू आणि इंदूर कॅम्पस येथे.
● B.Sc. इकनॉमिक्स सरला अनिल मोदी स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, मुंबई आणि स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, नवी मुंबई आणि बेंगळुरू कॅम्पस येथे.
● B.A. (ऑनर्स), लिबरल आर्ट्स ज्योती दलाल स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स, मुंबई येथे.
● BBA ब्रँडिंग अँड अॅडव्हर्टायझिंग अॅट स्कूल ऑफ ब्रॅंडिंग अँड अॅडव्हर्टायझिंग, मुंबई
● BBA (इंटरनॅशनल बिझनेस) एनएमआयएमएस सेंटर फॉर इंटरनॅशनल स्टडीज, मुंबई.
● BBMM प्रवीण दलाल स्कूल ऑफ आंत्रप्रीन्यूअरशीप अँड फॅमिली बिझनेस अॅट मुंबई.
पात्रता:
वरील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश पात्रता निकष:
उमेदवाराने 10+2 किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान 45% – 60% एकूण गुण प्राप्त असावेत आणि अभ्यास कार्यक्रमानुसार पात्रतेसाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या.
प्रवेशाकरिता अर्ज करा, नोंदणीसाठी www.nmims.edu/admission