केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या दर्शनी मूल्य १० रुपये असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी (इक्विटी शेअर) रु.३४७ ते रु.३६६ चा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
ही बीड/ऑफर बुधवार २१ डिसेंबर २०२२ रोजी बंद होईल.
बोली किमान ४० इक्विटीसमभागांसाठी आणि त्यानंतर ४० च्या पटीत लावता येणार आहे.
राष्ट्रीय, १४ डिसेंबर २०२२: केफीन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (“KFintech” किंवा “कंपनी”)ने प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या इक्विटी शेअर्सची (“इक्विटी शेअर्स”) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) सोमवार १९ डिसेंबर २०२२ पासून खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. (“विक्रीची ऑफर”). ऑफर फॉर सेल मध्ये जनरल अटलांटिक सिंगापूर फंड पीटीई. लिमिटेड (“प्रवर्तक विक्री भागधारक”) द्वारे १५,००० दशलक्ष रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. ही योजना बुधवार, २१ डिसेंबर २०२२ रोजी बंद होईल.
प्रत्येक इक्विटी समभागासाठी रु.३४७ ते रु. ३६६ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली किमान ४० इक्विटी समभागांसाठी आणि त्यानंतर ४० च्या पटीत लावता येणार आहे.
सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(२) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी नेट ऑफरच्या किमान ७५% पेक्षा कमी नसलेल्याना समभाग उपलब्ध होतील. बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून कंपनी पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सेबी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमत“) राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील. तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि बिगर संस्थात्मक भागांतर्गत बिगर संस्थात्मक बोलीदारांना वाटप करण्यासाठी उपलब्ध असलेले इक्विटी शेअर्स, खालील गोष्टींच्या अधीन असतील: (i) एक तृतीयांश भाग २००,००० रुपयांपेक्षा जास्त आणि १,०००,००० रुपयांपर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ii) दोन तृतीयांश भाग १,०००,००० रुपयांपेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल, अर्थात वर उल्लेख केलेल्या कोणत्याही उपविभागातील सबस्क्राईब न झालेल्या भागाची वाटणी बिगर –संस्थात्मक बोलीदारांच्या इतर उप–श्रेणीमधील अर्जदारांमध्ये होऊ शकेल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार योजनेच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलवार माहितीसाठी रेड हेंरिंग प्रॉस्पेक्टसच्या ४६४ पानावर सुरू होणारे “ऑफर प्रोस्युजर” बघा.
रेड हेंरिंग प्रॉस्पेक्टस द्वारे इक्विटी समभाग सादर केले जात असून बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (“NSE”)वर नोंदणीकृत करण्याचा प्रस्ताव आहे. ऑफर साठी निश्चित केलेला शेअर बाजार एनएसई असणार आहे.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे पी मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, आयआयएफएल सिक्युरिटीज लिमिटेड आणि जेफ्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
येथे वापरण्यात आलेल्या पण परिभाषित न केलेल्या सर्व संकल्पनांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्याप्रमाणेच आहे.