एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सचे विलिनीकरण होणार आहे. नव्य कंपनीत टाटाची ७४.९% आणि सिंगापूर एअरलाइनची (एसआयए) २५.१% भागीदारी असेल. नव्या कंपनीचे नाव एआय-विस्तारा-एआय एक्सप्रेस-एअर एशिया इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एएआयपीएल) होईल. सिंगापूर एअरलाइन्सने मंगळवारी सांगितले की, सिंगापूर एअरलाइन्स देवाण-घेवाण म्हणून एअर इंडियात २,०५८.५ कोटी रुपयांची गुंतवणूकही करेल. एसआयए आणि टाटाचे उद्दिष्ट मार्च २०२४ पर्यंत विलिनीकरण पूर्ण करणे आहे. या विलिनीकरणामुळे मार्केट शेअरमध्ये इंडिगोनंतर एअर इंडिया दुसऱ्या क्रमांकावर येईल.
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, ‘विलिनीकरण हा एअर इंडियाला जागतिक दर्जाची एअरलाइन बनवण्याच्या आमच्या प्रवासात मैलाचा दगड आहे. बदलाचा भाग म्हणून एअर इंडिया आपले नेटवर्क व ताफा वाढवत आहोत.’
जगात तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ विलिनीकरणानंतर एअर इंडिया मार्केट शेअरच्या बाबतीत इंडिगोनंतर दुसऱ्या क्रमांकावर येईल. इंडिगोचा मार्केट शेअर ५६.७% आहे आणि एअर इंडियाचा २५.९% होईल. विस्ताराचा मार्केट शेअर ९.२%, एअर इंडियाचा ९.१% आणि एअर एशियाचा ७.६% आहे. भारताची विमान वाहतूक बाजारपेठ सद्यस्थितीत जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आहे. पुढील १० वर्षांत ती दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.