साभार : दिव्या मराठी
उत्तर प्रदेशातील बदंयूमध्ये एका तरुणाने उंदीराला मारले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुमारे 10 तास त्याची चौकशी केली.
प्राणीप्रेमी आणि पीएफ संघटनेचे अध्यक्ष विकेंद्र सिंह यांनी पोलिसात एफआयआर दाखल केला आहे. ते म्हणाले की, आरोपी मनोज हा उंदराच्या शेपटीला दगड बांधून पुलाजवळील नाल्यात बुडवत होता. त्याला हटकल्यावर त्याने उंदराला नाल्यात फेकून दिले. त्यानंतर बांधलेल्या धाग्याच्या साहाय्याने बाहेर काढले आणि पुन्हा नाल्यात फेकले. उंदीर मरेपर्यंत तो हे करतच होता. आरोपीवर प्राणी क्रूरता कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. हे प्रकरण प्राण्यांच्या क्रूरतेशी संबंधित आहे, त्यामुळे मृतदेहाचे पोस्टमॉर्टम होणे गरजेचे आहे. याचा खर्च तक्रारदार उचलत आहे.
आता तुम्ही विचार करत असाल की, प्रत्येक सामान्य माणूस आयुष्यात कधी ना कधी उंदीर मारतोच. मग पोलिसांनी या तरुणालाच का अटक केली? उंदीर मारल्याबद्दल तुरुंगात जावे लागत असेल तर लोक उंदरांचा सामना कसा करतील. आजच्या कामाची गोष्ट मध्ये आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत.
प्रश्न- उंदीर मारल्याने पोलिस जर एखाद्याला पकडू शकतात, तर सामान्य माणूस उंदरांच्या दहशतीला कसा तोंड देणार?
उत्तर- याची पद्धत जाणून घेण्यासाठी खालील ग्राफिक वाचा आणि इतरांना देखील शेअर करा:
उंदीरांपासून मुक्त राहण्यासाठी तुम्ही नैसर्गिक पद्धती वापरा
- उंदीर घरात येऊ नयेत म्हणून घराबाहेर पुदिना किंवा लवंग तेल लावा.
- अख्खी लाल मिरची, काळी मिरी किंवा लवंग घराबाहेर पसरवू शकता. घरात मुले असतील तर लाल तिखट आणि काळी मिरी घालताना काळजी घ्या.
- पुदिना आणि मिरचीच्या बिया घराबाहेर लावता येतात. उंदरांना या वनस्पतींचा वास आवडत नाही, त्यामुळे ते घरात येत नाहीत.
- उंदीर पेपरमिंटचा वास सहन करू शकत नाहीत. कापसाच्या बॉलमध्ये पेपरमिंट घाला आणि जिथे उंदीर फिरतात तिथे ठेवा. ते पळून जातील.
- तमालपत्राच्या वासानेही उंदीर पळतात, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात ते ठेवण्याचा प्रयत्न करा.
या छिद्रातून किंवा उंदीर घरात प्रवेश करतात त्या छिद्राजवळ काळी मिरी ठेवा किंवा स्प्रे करा. हे उंदरांच्या नाकाला सहन होत नाही, त्यामुळे ते घरात यायला घाबरतात.
प्रश्न- घराच्या बाहेरच्या भागात जर उंदीर असतील तर तिथल्या उंदरांपासून सुटका कशी करायची?
उत्तर- हे फार अवघड काम नाही. तुम्हाला फक्त थोडी मेहनत करावी लागेल. जसे-
बाग स्वच्छ करा:
- उंदरांना मोकळी जागा फारशी आवडत नाही, म्हणून तुमचे लॉन किंवा बाग सुव्यवस्थित, स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवा.
- गवत जास्त वाढू देऊ नका. लाकडे किंवा पानांचा ढीग होऊ देऊ नका. बाहेरील डस्टबिन बंद ठेवा. वेळोवेळी स्वच्छता करत राहा.
- शेवटी, तुमच्या घराच्या बागेत किंवा लॉनमध्ये उंदरांना अन्न मिळत नाही ना ते तपासा. उदाहरणार्थ, पाळीव प्राण्यांची उर्वरित फळे, धान्ये किंवा भाज्या. तसे असेल तर तिथेही स्वच्छतेची काळजी घ्या.
कोरडा बर्फ वापरा
- विषाशिवाय उंदरांपासून मुक्त होण्याचा एक प्रभावी मार्ग म्हणजे कोरडा बर्फ वापरणे.
- कोरड्या बर्फामुळे कार्बन डाय ऑक्साईड तयार होतो, ज्यामुळे उंदरांना भूल चढते आणि उंदर मरतो.
- उंदराच्या बिळाच्या प्रवेशद्वारावर कोरडा बर्फ ठेवा. हे हातमोजे घालूनच करा. लक्षात ठेवा की कोरड्या बर्फामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते.
प्रश्न- बाजारात मिळणाऱ्या उंदीर मारण्याच्या औषधाने उंदीर मारला असेल तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी काय करावे?
उत्तर- खालील टप्प्यांचे अनुसरण करा:
- सर्व प्रथम रबरचे हातमोजे घाला.
- ज्या ठिकाणी उंदीर मरण पावला त्या ठिकाणी ब्लीच आणि पाणी किंवा व्यावसायिकरित्या उपलब्ध जंतुनाशक फवारणी करा.
- प्लास्टिकच्या पिशवीत उंदीर आणि त्याच्या सभोवतालची घाण ठेवा. वाटल्यास सापळा किंवा पिंजरा देखील ठेवू शकता किंवा फेकून देऊ शकता.
- पिशवी अशा प्रकारे बंद करा की हवा बाहेर जाणार नाही किंवा आत जाणार नाही, जेणेकरून जीवाणू किंवा विषाणू पसरणार नाहीत.
- सीलबंद पिशवी दुसऱ्या पिशवीत ठेवा आणि ती देखील सील करा.
- बॅग रस्त्याच्या कडेला असलेल्या डस्टबिनमध्ये फेकून द्या. हातमोजे लावलेले हात साबणाने आणि पाण्याने धुवा.
- तसेच सॅनिटायझर लावा. हातमोजे डस्टबिनमध्ये फेकून द्या.
आता जाणून घेऊया वर्तमान प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे-
प्रश्न- आपल्या समाजात उंदीर मारणे सर्रास होते, मग पोलिसांनी या व्यक्तीला का पकडले?
उत्तर- कारण या व्यक्तीने उंदरावर क्रौर्य केले होते म्हणजेच अत्याचार आणि क्रूरतेने मारले होते. त्याला हे करताना पाहून आणखी एका व्यक्तीने प्राणी क्रूरता कायद्याचा आधार घेतला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यामुळे पोलिसांनी त्याला पकडले.
प्रश्न- प्राणी क्रूरता कायदा काय आहे?
उत्तर- हा भारतीय संविधानांतर्गत येतो. जो प्राणी आणि पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी बनवला आहे. तपशीलवार समजून घेण्यासाठी खालील ग्राफिक वाचा:
अॅडव्होकेट सचिन नायक प्राणी मारणाऱ्या लोकांसाठी म्हणतात की…
- कोणत्याही प्राण्याला क्रूरतेने मारले किंवा त्रास दिला तर तुरुंगवास होईल.
- एखाद्या प्राण्याला मारणे किंवा क्रौर्याने मारणे यात खूप फरक आहे.
- जर उंदीर वेदनाशिवाय मेला तर तुरूंगात जावे लागणार नाही. जसे – औषधाद्वारे.
- कोणत्याही प्राण्याला विनाकारण किंवा तुमच्या मनोरंजनासाठी वेदना देऊ शकत नाही.
अखेरीस पण महत्त्वाचे
सदरील प्रकरणात उंदराचे पोस्टमॉर्टम झाले, सात दिवसांत अहवाल येईल
पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांनी उंदराचे पोस्टमॉर्टम केले आहे. मात्र, संपूर्ण खर्च तक्रारदार विकेंद्र सिंह यांनी उचलला. रुग्णवाहिका नव्हती, म्हणून त्यांनी उंदराचा मृतदेह बदाऊनहून सुमारे 50 किमी दूर बरेलीला पाठवण्यासाठी एसी कारसाठी 1500 रुपये दिले. शरीराचे विघटन होऊ नये म्हणून एसी कार वापरली. पोस्टमॉर्टमसाठी 225 रुपयांची पावतीही कापण्यात आली. आता पोस्टमॉर्टमचा अहवाल आठवडाभरानंतर येईल.
डेप्युटी एसपी (शहर) आलोक मिश्रा यांनी सांगितले की, आरोपींविरुद्ध सदर कोतवाली पोलिस ठाण्यात आयपीसीच्या कलम 429 आणि प्राण्यांवर क्रूरता कायद्याच्या कलम 11(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.