ठाणे,: रक्ताची गरज सार्वत्रिक आहे आणि एक दान तीन जीव वाचवते या संकल्पनेला पाठिंबा देत कोरम मॉलने आज एचडीएफसीच्या सीएसआर उपक्रम परिवर्तनसह रक्तदानाला पाठिंबा देत आपली सामायिक जबाबदारी पार पाडली. रक्तदान मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
कोरम मॉलने सलग वर्ष रक्तदान मोहिमेचे आयोजन केले असून आरोग्य आणि जीव वाचवण्यासाठी असलेली त्यांची समर्पण भावना दाखवून दिली आहे. मॉलच्या या उपक्रमाने मानवता आणि जनकल्याणासाठी असलेल्या त्यांच्या समर्पणाची पुष्टी मिळते.
रक्तदान शिबिराचे क्षेत्र निर्जंतुक करणे, हातमोजे घालणे आणि एकल वापराच्या सुया वापरणे यासह अत्यंत सुरक्षित वातावरणात रक्तदान मोहीम पार पडली. याशिवाय, रक्तदात्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी १३ वैद्यकीय व्यावसायिक आणि इतर सपोर्ट स्टाफचा एक गट उपस्थित होता. हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७.३० वाजेपर्यंत मॉलच्या प्रवेशस्थानापाशी झाला. सुरक्षा प्रोटोकॉलचा एक भाग म्हणून रक्तदात्यांची वैद्यकीय माहिती, शरीराचे तापमान, रक्तदाब, नाडी आणि हिमोग्लोबिनची पातळी यासंबंधी तपासणी करण्यात आली. रक्तदात्यांच्या आगमनापासून ते जाईस्तोवर प्रक्रिया संपेपर्यंत तपशीलवार काम करण्यात आले.
या रक्तदान मोहिम कार्यक्रमात मॉलचे कर्मचारी आणि स्टोअर कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग दिसला. रक्तदात्यांना बाटलीबंद पाणी, ग्लुकोज बिस्किटे आणि अल्पोपहार देण्यात आला. कोरम सातत्याने जन समुदाय-आधारित कार्यक्रमांचे नियोजन करण्यात अग्रेसर आहे आणि एक ब्रँड म्हणून ते मोठ्या प्रमाणावर समाज कल्याणाची काळजी घेतात. रक्ताची अनुपलब्धता किंवा कमतरता यामुळे जीव वाचवण्यासाठी रक्तदानाच्या महत्त्वावर भर देणारा रक्तदान शिबिर कार्यक्रम आपल्या आवारात आयोजित करण्याचा मान कोरमला मिळाला आहे.