‘गणपती तू, गुणपती तू’ हा लोकप्रिय गण एक नवीन बाजात आला प्रेक्षकांच्या भेटीला….
राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने आजपर्यंत संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. तिच्या युट्यूब सिरीजमुळे सावनी नेहमीच चर्चेत राहिली आहे. ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ ह्या तिच्या युट्यूब सिरीजमध्ये तिने कमाल अशी गाणी नेहमीच प्रेक्षकांना दिली. प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद देखील या सिरीजला मिळाला. बाप्पा म्हटलं कि आपोआपच चेहऱ्यावर तेज ,स्मितहास्य येतं. ढोल, ताश्याचा गजर बाप्पाची गाणी कानी घुमू लागतात. हाच आनंदसोहळा द्विगुणित करायला सावनी रवींद्र तिच्या ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ ह्या युट्यूब चॅनलवर गणेशोत्सव स्पेशल एक अनप्लग कव्हर सॉंग ‘गणपती तू, गुणपती तू’ घेऊन आली आहे. हे गण जगदीश खेबूडकरांनी गीतबद्ध केलेला असून याच संगीत यशवंत देव यांचा आहे. ‘मंत्र्यांची सून’ ह्या चित्रपटातील हा गण डॉ. वसंतराव देशपांडे ह्यांनी गायलेला होता. हाच गण एका नवीन अंदाजात आपल्या समोर घेऊन आलीय खुद्द सावनी रवींद्र. स्त्री वेशातील शाहीर पाहिलीय का कधी? नाही ना! म्हणूनच नेहमीच संगीतात नवनवीन प्रयोग करणारी आपली सावनी रवींद्र घेऊन आलीय ‘गणपती तू, गुणपती तू’ हा जगप्रसिद्ध असा गण अनप्लग्ड कव्हर सॉंगच्या रूपात. प्लॅनेट मराठीला अनेक गुणी कलावंत लाभलेले आहेत. प्लॅनेट मराठीतील प्लॅनेट टॅलेंट आणि सावनी यांच्या संघटनेतील हा नवीन प्रयोग आहे.
सावनी रवींद्र गाण्याविषयी म्हणते,” येत्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने हे गाणं तुमच्या भेटीला घेऊन आलीय याच मुख्य कारण म्हणजे डॉ. वसंतराव देशपांडे यांची गायकी मला लहानपणापासून फार इन्स्पायर करत आली आहे. त्यांच्या शिष्य परंपरेतला शिक्षण मला माझ्या वडिलांकडून मिळत आला आहे. डॉ. वसंतराव देशपांडे यांच गाणं सादर करणं खरंच खूप आव्हानात्मक आहे. पण हेच आव्हान मी स्वीकारलं आणि ‘गणपती तू, गुणपती तू’ हे कव्हर सॉंग तुमच्या समोर घेऊन आले आहे. माझ्या युट्यूब सिरीज ‘सावनी अनप्लग्ड सिजन ३’ ला तुम्ही खूप प्रेम देत आहात असच प्रेम या गाण्याला सुद्धा द्याल याची मला खात्री आहे.”
YouTube Link:
https://youtu.be/a6a7X8x_YJI