भारत आणि झिम्बाब्वेमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय मिळवला आहे. झिम्बाब्वेच्या 162 धावांचं आव्हान भारतीय संघाने 5 गडी राखत आणि 154 चेंडूंमध्ये पुर्ण केलं. भारतातर्फे संजू सॅमसनने सर्वाधिक नाबाद 43 धावांची खेळी केली.
टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे झिम्बाब्वे संघ प्रथम फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली नव्हती. एका मागोमाग एक फलंदाजांचे विकेट जात होते. त्यामुळे झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ अवघ्या 161 धावांवर गारद झाला. दीपक चहरच्या जागी संधी मिळालेल्या शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 3 बळी घेतले तर कुलदीप यादव, अक्षर पटेल, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
भारताची सुरूवात निराशाजनक झाली, कर्णधार के. एल. राहुल 1 धावा काढून स्वस्तात परतला. त्यानंतर आलेल्या शुभमन गिल आणि धवनची जोडी आजही सामना जिंकवणार असं वाटत होतं मात्र 33 धावांवर धवनही बाद झाला. इशान किशनलाही चमक दाखवता आली नाही तोही 6 धावा काढून परतला.