पुढील 3 दिवसात मुसळधार, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : आता पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. कोकणातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस सांगण्यात आला आहे. तर मुंबईसह आसपासच्या परिसरात हलका ते मध्य स्वरुपाचा पाऊसाचा अंदाज आहे.
कोणत्या भागात पावसाची शक्यता?
कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर ठाणे, पालघर आणि मुंबईतही काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.
मध्य महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, साता-यात घाट भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर नाशिक, नंदूरबारमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे.