भारताचा टेबिल टेनिसपटू अचंथा शरथ कमलने इतिहास रचून सुवर्णपदक जिंकले आहे. अचंथा शरथच्या टेबिल टेनिसमधील सुवर्णपदकाने भारताने एकाच दिवसात चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. यापूर्वी भारताच्या पी.व्ही.सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक व चिराग यांनी बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत.
सात्विक आणि चिरागने पटकावले तिसरे सुवर्ण
भारताने बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदकाची हॅट्रीक साजरी केली. भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक रानकीरेड्डी यांनी पुरूषांच्या दुहेरीत सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.
भारताने ६१ पदकांसह २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेची सांगता केली. यामध्ये २२ सुवर्ण, १६ रौप्य, २३ कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारताचे पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक- 22
मीराबाई चानू, जेरेमी लालरिनुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगट, नवीन, भाविना पटेल, नीतू घणघस, अमित पंघाल, एल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरथ-श्रीजा, पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक व चिराग, अचंथा शरथ
रौप्यपदक- 16
संकेत सरगर, बिंद्याराणी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशू मलिक, प्रियंका गोस्वामी, अविनाश साबळे, पुरुष लॉन बॉल संघ, अब्दुल्ला अबोबकर, शरथ-साथियान, महिला क्रिकेट संघ, सागर, पुरुष हॉकी संघ
कांस्यपदक- 23
गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंह, सौरव घोषाल, गुरदीप सिंह, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल, जास्मिन, पूजा गेहलोत, पूजा सिहाग, मोहम्मद हुसामुद्दीन, दीपक नेहरा, रोहित टोकस, महिला हॉकी संघ , संदीप कुमार, अन्नू राणी, सौरव-दीपिका, किदम्बी श्रीकांत, त्रिशा-गायत्री.