• अशा प्रकारचा एकमेव क्यूआर कोडवर आधारित पॉलिसी सारांश, एक दिवसांत दाव्याचा निपटारा*, वेल्थ प्रो-प्लानची हमी आणि २४X७ व्हॉट्सअॅप सपोर्ट यांवर प्रकाश टाकणाऱ्या चार टीव्हीसींचे (जाहिराती) लाँचिंग
• कंपनीच्या #DoTheSmartThing या मूल्यविधानाखालील या नवीन अभियानामध्ये, विम्याचे सुलभीकरण करण्यात आले असून, भारतीयांना मूल्य, उत्पादने व सेवा यांचे अधिक चतुर पर्याय पुरवण्यात आले आहेत.
• भारती अक्सा लाइफची सोनीक आयडेंटिटी ट्यून ही समभागधारकांना सखोल, विविध संवेदना जागवणारा अनुभव देण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आली आहे, आणि यातून ब्रॅण्डची ओळख, वैशिष्ट्ये दिसून येतात, हा ब्रॅण्डच्या व्यक्तिमत्वाचाच
विस्तार आहे
मुंबई : भारतातील आघाडीच्या उद्योग समूह भारती एंटरप्रायजेस आणि जगातील सर्वांत मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक अक्सा यांच्यातील जॉइंट व्हेंचर भारतीय अक्सा लाइफने आज आपल्या एकात्मिक अभियानाची घोषणा केली. हे अभियान ब्रॅण्डच्या या विधानाखाली #DoTheSmartThing राबवले जात आहे. एलअँडके सात्शी अँड सात्शीच्या संकल्पनेतून हे बहुमाध्यम अभियान विकसित करण्यात आले आहे. विद्या बालन ब्रॅण्ड अँबॅसडर असलेल्या या अभियानाचे उद्दिष्ट विम्याचे सुलभीकरण करणे आणि भारतीयांना योग्य ते विमा संरक्षण निवडताना मूल्य, उत्पादन व सेवांमधील अधिक चतुर पर्याय पुरवणे हे आहे. हे अभियाज विविध माध्यमांद्वारे ग्राहकांशी संवाद साधणार आहे, यांमध्ये टेलीव्हिजन, डिजिटल आणि सोशल मीडियाचा समावेश होतो. नवीन एकात्मिक अभियान सुरू करण्यासोबतच भारतीय अक्सा लाइफने आपल्या सोनिक आयडेंटिटीचेही अनावरण केले आहे. ही ओळख भविष्यकाळासाठी सज्ज असण्याच्या ब्रॅण्डच्या वैशिष्ट्याशी सुसंगत आहे.
गेल्या वर्षी भारती अक्सा लाइफने ‘इन अ कॉम्प्लिकेटेड वर्ल्ड, वी मेक इन्शुरन्स सिम्पल (गुंतागुंतीच्या जगात आम्ही विमा सुलभ करतो)’ हे आपले नवीन उद्दिष्ट सर्वांपुढे आणले होते. कंपनी आपल्या या उद्दिष्टाच्या दिशेने कशी वाटचाल करत आहे आणि ग्राहकांना #DoTheSmartThing मध्ये कशी मदत करत आहे, यावर हे नवीन अभियान आधारित आहे. हे अभियान बहुभाषिक स्वरूपात विकसित करण्यात आले आहे आणि हिंग्लिश, मराठी, बंगाली, तमीळ, तेलुगू, कन्नड आणि ओडिया अशा भाषांतील कॉण्टेण्टद्वारे ते ग्राहकांशी संवाद साधेल.
ब्रॅण्डच्या सोनीक आयडेंटिटीमधून खऱ्या अर्थाने ओळख, वैशिष्ट्ये व व्यक्तिमत्वाचा विस्तार यांचे प्रतिबिंब दिसते. एक अनन्यसाधारण श्राव्य अनुभव देण्याच्या तसेच ग्राहक, कर्मचारी व भागीदार आदी सर्व सबंधितांना भारती अक्सा लाइफची आठवण राहील हे निश्चित करण्याच्या उद्दिष्टाने ही ट्युन तयार करण्यात आली आहे. सोनिक आयडेंटिटीचा लाभ सर्व ब्रॅण्ड असेट्स, व्यवहार, ग्राहक कॉलर ट्यून्स, रिंगटोन्स आदींसाठी घेतला जाणार आहे.
राजेश साथी यांनी दिग्दर्शित केलेल्या चार टीव्हीसींच्या लाँचसह या अभियानाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक टीव्हीसी कंपनीच्या अनन्यसाधारण उत्पादने व सेवांवर लक्ष केंद्रित करणारी आहे. या अभियानातील कथनाचे मूळ भारती अक्सा लाइफच्या उद्दिष्ट विधानात आहे. हे ग्राहकांबाबतचे ज्ञान आणि तत्काळ उपाय, सुलभ उपलब्धता तसेच आयुष्याच्या सर्वच क्षेत्रांमध्ये सोय यांची मागणी करण्याकडे असलेला ग्राहकांचा कल यांतून आले आहे. हे ग्राहकांच्या वित्तीय ब्रॅण्ड्स व विम्याला दिल्या जाणाऱ्या प्राधान्यक्रमांमधूनही दिसून येते. वर्तनातील या नमुन्याची दखल घेत, भारती अक्सा लाइफने ग्राहकांच्या उत्क्रांत होत जाणाऱ्या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी समायोजन केले तसेच सोल्युशन्स विकसित केली तसेच आजच्या पिढीसाठी नवोन्मेषकारी उत्पादन व सेवांचा विकास केला.
पारंपरिकरित्या विमा पॉलिसी म्हणजे दस्तावेजीकरण व पॉलिसीचे तपशील भरणे असे समीकरण झालेले होते आणि हे खूपच कटकटीचे होते. यावर उपाय म्हणून कंपनीने उद्योगक्षेत्रातील पहिलेच क्यूआर कोडवर आधारित कार्ड बाजारात आणले. यामध्ये महत्त्वाच्या तपशिलांसह पॉलिसीचा सारांश दिला जातो. याचा वेध हलक्या-फुलक्या पद्धतीने घेण्याचा भाग म्हणून, एका टीव्हीसीच्या सुरुवातीला मुख्य व्यक्तिरेखा दिवाणखान्यात पसरलेले कागद व खोकी धुंडाळताना दिसते. तेव्हाच विद्या बालन खोलीत प्रवेश करते आणि तो विम्याच्या पॉलिसीचे दस्तावेज शोधण्याचा प्रयत्न करत आहे हे तिला कळते. मग ती त्याला भारती अक्सा लाइफ इन्शुरन्सचा क्यूआर कोडवर आधारित सुलभ सारांश दाखवते. यात विमा पॉलिसीचा सारांश विनाकटकट बघता येतो आणि तो कधीही, कुठेही उपलब्ध होतो. कंपनी आयुर्विम्याची मालकी कशी सुलभ करते आणि ती दस्तावेजविरहित पद्धतीने समजून घेणे शक्य होते, यावर या जाहिरातीतून प्रकाश टाकला जातो.