ऑर्डर इन-फ्लो या तिमाहीमध्ये २३% नी आणि या सहामाहीमध्ये ३६% नी वाढला
महसूल तिमाही आणि सहामाही दोन्हीमध्ये २३% नी वाढला
पी ए टी (नफा) तिमाहीमध्ये २३% नी आणि सहामाहीमध्ये ३१% नी वाढला
मुंबई, ऑक्टोबर ३१, २०२२:
लार्सन अँड टुब्रो ने ३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाही मध्ये रु.४२,७६३ कोटी एवढा एकत्रित महसूल मिळवला. पायाभूत सुविधा विभागांना मोठ्या प्रमाणात नफा मिळाल्याने आणि आय टी आणि टी एस विभागांनी वाढीची गती कायम राखल्याने मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही पेक्षा (वायओवाय) या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाही मध्ये एकूण महसूल २३% नी वाढला आहे. या तिमाहीत एकूण महसुलाच्या ३६% म्हणजे रु.१५,४७३ कोटी एवढा आंतरराष्ट्रीय महसूल आहे.
३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या सहामाहीमध्ये कंपनी ला रु. ७८,६१६ कोटी एवढा एकत्रित महसूल मिळाला असून जो मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाही पेक्षा (वायओवाय) २३% नी वाढला आहे. ज्यामध्ये एकूण महसुलाच्या ३७% म्हणजे रु. २८,७०८ कोटी एवढा महसूल आंतरराष्ट्रीय महसूल आहे.
३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीमध्ये कंपनीला टॅक्स कापल्यानंतरचा नफा (पी.ए.टी) रु.२,२२९ कोटी एवढा झाला आहे जो मागील वर्षाच्या या वेळेच्या तिमाहीपेक्षा (वायओवाय) भरपूर जास्त म्हणजे २३% नी वाढला आहे. सर्व प्रमुख विभागांनी अधिक नफा दर्शविला आहे; ज्याचे नेतृत्व आय.टी व टी.एस आणि आर्थिक सेवा देणाऱ्या व्यवसायांनी केले.
३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या सहामाहीमध्ये कंपनीला टॅक्स कापल्यानंतरचा नफा (पी.ए.टी) रु.३९३१ कोटी एवढा झाला आहे जो मागील वर्षाच्या या वेळेच्या सहामाहीपेक्षा (वायओवाय) भरपूर जास्त म्हणजे ३१% नी वाढला आहे.
या तिमाहीच्या अखेरपर्यंत म्हणजे ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत कंपनीने रु.५१,९१४ कोटी रूपयांची ऑर्डर नोंदवली आहे जी मागील वर्षाच्या या वेळेच्या तिमाहीपेक्षा (वायओवाय) २३% नी वाढली आहे. या तिमाहीमध्ये आम्हाला विविध विभागांकडून, जसे सार्वजनिक क्षेत्र, आण्विक ऊर्जा, जलसिंचन, आरोग्य, लोह धातूशी संबंधित क्षेत्र, रिनिवेबल आणि रिफायनरी विभाग, ऑर्डर आली आहे. एकूण ऑर्डर इनफ्लो च्या ३३% म्हणजे रु.१७,३४१ कोटींची ऑर्डर इनफ्लो ही आंतरराष्ट्रीय ग्राहकांकडून आहे.
३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या सहामाहीमध्ये एकूण सर्व एकत्रित आधारावर पाहता रु. ९३,७२० कोटींचा ऑर्डर इनफ्लो नोंदविला गेला; जो मागील आर्थिक वर्षाच्या या वेळेच्या सहामाहीपेक्षा (वायओवाय) ३६% वाढला आहे. या सहामाहीमध्ये एकूण आंतरराष्ट्रीय ऑर्डर इनफ्लो रु.३५,१८४ कोटींची म्हणजे एकूण ऑर्डर इनफ्लोच्या ३८% आहे.
३० सप्टेंबर २०२२ रोजी कंपनीची एकत्रित ऑर्डर बूक रु.३७२,३८१ कोटी एवढ्यावर होती ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डरस् चा हिस्सा २८% आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्प विभाग:
पायाभूत सुविधा प्रकल्प विभागाने ३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीमध्ये रु.२५,०५८ कोटींचा ऑर्डर इनफ्लो नोंदविला जो मागील आर्थिक वर्षाच्या या वेळेच्या तिमाहीपेक्षा (वायओवाय) फार जास्त जोमदार म्हणजे १००% हून जास्त वाढला आहे. या विभागाच्या एकूण ऑर्डर इनफ्लो पैकी २७% म्हणजे रु. ६,७०० कोटींचा ऑर्डर इनफ्लो आंतरराष्ट्रीय आहे.
या विभागाचे ३० सप्टेंबर २०२२ रोजी ऑर्डर बूक रु.२६८,७५२ कोटी असून त्यामध्ये आंतरराष्ट्रीय मागणीचा हिस्सा २४% आहे.
या विभागाने ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये रु. १९,३७० कोटींचा एकूण ग्राहक महसूल नोंदविला जो मागील आर्थिक वर्षाच्या या वेळेच्या तिमाहीपेक्षा (वायओवाय)
वेगवेगळ्या साईट वरील प्रकल्पांच्या अंमबलाजवणीमुळे ३९% नी वाढला आहे. या तिमाहीमध्ये या विभागाचे आंतरराष्ट्रीय महसूल एकूण ग्राहक महसूलाच्या १९% आहे.
या विभागाचा ३० सप्टेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीमध्ये इ बी आय टी डी ए मार्जिन
६.६% आहे जो मागील आर्थिक वर्षाच्या या वेळेच्या तिमाहीमध्ये ८.३% होता. या तिमाही वरील मार्जिन वर काही प्रकल्पांवरील खर्चाच्या ताणाचा परिणाम झाला आहे.
ऊर्जा प्रकल्प विभाग:
ऊर्जा प्रकल्प विभागाने ३० सप्टेंबर २०२२ ला संपलेल्या तिमाहीमध्ये रु.८,४४१ कोटींची ऑर्डर
मिळविली जी मागील आर्थिक वर्षाच्या या वेळेच्या तिमाही (वायओवाय)पेक्षा ४२% खाली आलेली दिसते कारण मागील वर्षी हायड्रो कार्बन व्यवसायात एक मोठी आंतरराष्ट्रीय ऑर्डर मिळाली होती. ऊर्जा प्रकल्प विभागात या तिमाहीमध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डर इनफ्लो एकूण ऑर्डर इन फ्लो च्या ३% नोंदविला गेला.
३० सप्टेंबर २०२२ रोजी या विभागाची ऑर्डर बूक रु.६८,९७१ कोटी एवढ्यावर…