मुंबई, २०२२ – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीला आयडीसी फ्युचर एंटरप्राइज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमृतसरमध्ये झालेल्या आयडीसी डीएक्स समिट २०२२ मध्ये कंपनीला त्यांच्या ‘डिजिटल नर्व्ह सेंटर- आयरिस’साठी ‘बेस्ट इन फ्युचर ऑफ ऑपरेशन्स’ विभागाअंतर्गत हा पुरस्कार मिळालेला आहे.
कंपनीच्या आयरिस या डिजिटल प्लॅटफॉर्मची आशिया पॅसिफिक देशांतील निव़क १००० प्रवेशिकांमध्ये निवड करण्यात आली होती. हा पुरस्कार बीपीसीएलने पॅन भारतातील केंद्रांत कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित केलेल्या कामाला तसेच बीपीसीएलच्या देशभरातील नेटवर्कमध्ये रियल टाइम डेटा समाविष्ट करत पर्यावरणावर केलेल्या सकारात्मक परिणामाला मिळालेली पावती आहे.
आयरिस पूर्णपणे पारदर्शक आणि कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चालणारी यंत्रणा आहे. ही यंत्रणा नव्या आणि सद्य तंत्रज्ञानाचा समतोल साधत काम करण्याच्या संकल्पनेवर आधारित आहे. यातून ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्याच्या हेतूने अंतर्गत कार्यक्षमता व सातत्यपूर्ण वितरण पद्धती तयार केली जाते. यामुळे बीपीसीएलला ‘टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी’ (तंत्रज्ञानाधिष्ठित कंपनी) या नात्याने आपले वेगळेपण दाखवून देत ग्राहकांच्या मनात अनोखे स्थान तयार करणे शक्य झाले आहे.
बीपीसीएलने ग्राहकांसाठी विश्वास, सोयीस्करपणा आणि वैयक्तिक पसंतीनुसार सेवा देण्यासाठी, कार्यक्षमता व कामातील पारदर्शकता उंचावण्यासाठी मोठ्या पातळीवर डिजिटल बदल घडवून आणले आहेत.
एआय आणि मशिन लर्निंग क्षमतेच्या जोरावर चालणारे आयरिस हे बीपीसीएल क्लाउड इंटिग्रेटिंग रिटेल आउटलेटस, टर्मिनल्स, एलपीजी प्लँट्स आणि मोठे आय अँड सी ग्राहक होस्ट केले जाते. फ्युएल टर्मिनल्सपासून एलपीजी प्लँट्स व फ्युएल स्टेशन्सपर्यंत प्रत्येक उत्पादनाच्या प्रवासावर देखरेख करण्यासाठी, संपूर्ण मूल्य साखळी समाविष्ट करण्यासाठी आणि गरजेप्रमाणे तत्काळ कार्यवाही करण्याची क्षमता देण्यासाठी हे सेंटर तयार करण्यात आले आहे.
हा पुरस्कार बीपीसीएलच्या भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी तेल आणि वायू कंपनीचे डिजिटल रुपांतर घडवून आणत आपले विक्री आणि वितरण नेटवर्क नव्याने तयार करण्यासाठी घेण्यात आलेल्या प्रयत्नांची दखल घेणारा आहे.
आयडीसीसाठी डिजिटल ट्रान्सफर्मेशन (डीएक्स) हा असा एक दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये आपल्या व्यावसायिक पद्धती व यंत्रणेत बदल घडवून आणण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान व क्षमतांचा वापर कंपन्यांतर्फे केला जातो.