मुंबई, मार्च, २०२४: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने न्यू फॉरेव्हरप्रती आपल्या कटिबद्धतेशी बांधील राहत आज भारतातील पहिल्या क्रमांकाचा विक्री होणारा एसयूव्ही ब्रॅण्ड नेक्सॉनला आयसीई व ईव्ही ऑफरिंग्जसाठी प्रतिष्ठित #DARK अवतारामध्ये लाँच केले. या यशस्वी श्रेणीमध्ये अधिक भर करत कंपनीने आपल्या प्रिमिअम एसयूव्ही – नवीन सफारी आणि नवीन हॅरियरला देखील त्यांच्या #DARK व्हर्जन्समध्ये लाँच केले. नवीन नेक्सॉनसाठी ११.४५ लाख रूपये या सुरूवातीच्या किमतीमध्ये उपलब्ध असलेली #DARK श्रेणी उद्योगामध्ये ट्रेण्डसेटर आहे, जेथे तिच्या लाँचपासून भव्यता व लक्झरी दिसून येते.
#DARK श्रेणीसाठी किंमत तक्ता:
उत्पादन | किंमत यापासून सुरूवात होते |
नवीन नेक्सॉन #DARK | ११.४५ लाख रूपये (एक्स शोरूम, दिल्ली) |
नवीन नेक्सॉन.ईव्ही #DARK | १९.४९ लाख रूपये (एक्स शोरूम, भारतभर) |
नवीन हॅरियर#DARK | १९.९९ लाख रूपये (एक्स शोरूम, दिल्ली) |
नवीन सफारी#DARK | २०.६९ लाख रूपये (एक्स शोरूम, दिल्ली) |
या लाँचबाबत मत व्यक्त करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.चे मुख्य व्यावसायिक अधिकारी श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ”#DARK एडिशनने नवीन पिढीचे लक्ष वेधून घेतले आहे, ज्यामधून त्यांची सर्वसमावेशक आवड व पसंती दिसून येते. आकर्षक एक्स्टीरिअर डिझाइन आणि वैशिष्ट्य संपन्न इंटीरिअर असलेल्या नवीन #DARK फॅमिलीमध्ये नेक्सॉन.ईव्ही, नेक्सॉन, हॅरियर आणि सफारी यांचा समावेश आहे, ज्यांचे पुनरागमन झाले असून पूर्वीपेक्षा अधिक सर्वोत्तम आहेत. आम्हाला विशेषत: या श्रेणीसाठी संकल्पना मांडण्यात आलेली आमची नवीन मोहिम सादर करण्याचा देखील आनंद होत आहे, जी निश्चितच उत्साह व सक्षमीकरणाची भावना जागृत करेल, तसेच व्यक्तींना लक्झरी व उच्च दर्जाच्या कारागिरीशी संलग्न नवीन #DARK श्रेणीच्या अद्वितीय क्षमतांचा शोध घेण्यास आवाहन करेल.”
२०१९ मध्ये लाँच करण्यात आलेली हॅरियर आणि २०२१ मध्ये पोर्टफोलिओमध्ये वाढ करण्यासोबत टाटा मोटर्सने #DARK सह उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क स्थापित केले आहेत. #DARK ने तेव्हापासून टाटा पॅसेंजर आणि इलेक्ट्रिक वेईकल्स पोर्टफोलिओची स्टाइल व प्रिमिअम अपील अधिक उत्साहवर्धक केले आहे, ज्यामुळे ही श्रेणी ग्राहकांसाठी निवडण्याकरिता लक्षवेधक व अद्वितीय तत्त्व बनली आहे. #DARK श्रेणी तिचे सिग्नेचर #DARK मास्कट आणि या श्रेणीसाठी खास असलेल्या डार्क एक्स्टीरिअर ट्रीटमेंटसह भारतातील सर्वात लोकप्रिय एसयूव्हींमध्ये उत्साहवर्धक सुधारणा घेऊन येत आहे.
नवीन #DARK श्रेणी लाँच:
नेक्सॉन.ईव्ही: भारतातील पहिल्या क्रमांकाची ईव्ही नेक्सॉन.ईव्हीच्या आकर्षक #DARK अवतारामध्ये अनेक उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत, जी ऑटोमोटिव्ह अनुभवाला नव्या उंचीवर घेऊन जातात. या वेईकलच्या आकर्षक लुकमधील लक्षवेधक डिजिटल डिझाइन शैली, शार्पर लाइन्स अद्वितीय एसयूव्ही व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देतात. एक्स्टीरिअरमधून अधिक शक्तिशाली स्टान्ससह प्रबळ रचना दिसून येते, जेथे सिग्नेचर #DARK मास्कट आणि विशिष्ट डार्क एक्स्टीअिर ट्रीटमेंटसह तिची विशिष्टता अधिक वाढते.
एसयूव्हीचे इंटीरिअर्स अत्याधुनिक आहे, ज्यामध्ये अधिक आरामदायीपणासाठी काळजीपूर्वक डिझाइन करण्यात आलेल्या ऑल-ब्लॅक लेदरेट बोल्स्टर्ड सीट्स आहेत. सुरक्षिततेला नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांसह अधिक प्राधान्य देण्यात आले आहे, जसे एसओएस कॉलिंग फंक्शन, डिजिटल कॉकपीटमध्ये एम्बेडेड मॅप्स व्ह्यू आणि ब्लाइण्ड स्पॉट व्ह्यू मॉनिटर, ज्यामधून प्रत्येक प्रवासादरम्यान मन:शांतीची खात्री मिळते. नेक्सॉन.ईव्ही #DARK आपल्या गेम-चेंजिंग वैशिष्ट्यांसह तंत्रज्ञानाच्या मर्यादांना दूर करते. वेईकल टू वेईकल चार्जिंग आणि वेईकल टू लोड टेक्नॉलॉजी क्षमतेला नव्या उंचीवर नेतात, तर समाविष्ट करण्यात आलेले अॅरेकेड.ईव्ही, १५ हून अधिक अॅप्ससह इनबिल्ट अॅप सूट आणि हार्मनची ३१.२४ सेमी सिनेमॅटिक टचस्क्रिन सिस्टम तुमच्या मनोरंजन गरजांची पूर्तता करतात.
९ स्पीकर्स असलेली जेबीएल सिनेमॅटिक साऊंड सिस्टम अभूतपूर्व ऑडिओ अनुभव देते. कार्यक्षमतेसंदर्भात नेक्सॉन.ईव्ही #DARK तिच्या विभागातील सर्वोच्च रेंजसह नवीन मानक स्थापित करते, जेथे प्रभावी एआरएआय प्रमाणित ४६५ किमी रेंज देते. पॅडल शिफ्टर्स रिजनरेटिव्ह ब्रेकिंगचा वापर करत सुधारित कंट्रोल देते, ज्यामधून डायनॅमिक ड्रायव्हिंग अनुभवाची खात्री मिळते. एण्ड-टू-एण्ड डीआरएल व टेल लॅम्प्ससह स्मार्ट डिजिटल लाइट्स समोरील बाजूस पुरेसा प्रकाश देत अद्वितीय सुस्पष्टतेची खात्री देते. आकर्षक डिझाइन, भावी तंत्रज्ञान व तडजोड न करता येणारी कार्यक्षमता यासह नेक्सॉन.ईव्ही #DARK ऑटोमोटिव्ह क्षेत्रात खराखुरा गेम-चेंजर आहे.
नेक्सॉन: नेक्सॉन #DARK च्या एक्स्टीरिअर डिझाइनमधून आकर्षक व आक्रमक एसयूव्ही स्टाइल दिसून येते, जिला पूरक असे शिसेल्ड हूड, स्लीक एलईडी लॅम्प्स आणि डायनॅमिक स्टान्स आहे. विशेष #DARK मास्कट आणि डार्क एक्स्टीरिअर ट्रीटमेंटसह हा विशिष्ट लुक अधिक आकर्षक करण्यात आला आहे, ज्यामुळे वेईकल सर्वांचे लक्ष वेधून घेते. नेक्सॉन #DARK च्या केबिनमध्ये एसयूव्हीची व्यावहारिकता कायम राखण्यात आली आहे, तसेच आधुनिक व सर्वोत्तम वातावरणाचा अनुभव मिळतो. लक्झरीअस व विशेष ऑल-ब्लॅक आकर्षकतेसह इंटीरिअरच्या आकर्षकतेमध्ये अधिक भर करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, ज्यामध्ये ब्लॅक लेदरेट सीट्ससह हेडरेस्ट्सवर कोरलेले #DARK बॅजिंग आहे. केबिनमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह ‘हिडन अनटिल लिट’ कॅपेसिटिव्ह टच एफएटीसी पॅनेल आहे, ज्यामधून एकसंधी व सर्वोत्तम युजर अनुभवाची खात्री मिळते. समाविष्ट करण्यात आलेले अॅमेझॉन अॅलेक्सा आणि टाटा वॉईस असिस्टण्ट सहा भाषांमध्ये २०० हून अधिक वॉईस कमांड्स देतात, ज्यामधून अद्वितीय सोयीसुविधा व कनेक्टीव्हीटी मिळते. तसेच, नेक्सॉन #DARK मध्ये वायरलेस चार्जर आहे, ज्यामधून गुंतागूंतीच्या केबल्सचा त्रास दूर होतो आणि तुमचे डिवाईसेस चालता-फिरता चार्ज राहण्याची खात्री मिळते. लक्षवेधक डिझाइन, लक्झरीअस इंटीरिअर्स आणि प्रगत वैशिष्ट्यांसह नेक्सॉन #DARK तिच्या विभागातील एसयूव्हींसाठी नवीन मानक स्थापित करते.
हॅरियर आणि सफारी: या ओएमईजीएआरसी टि्वन्समध्ये डायनॅमिक व उत्साही ५-आसनी टाटा हॅरियर आणि प्रिमिअम व लक्झरीअस फ्लॅगशिप ७-आसनी टाटा सफारीचा समावेश आहे, ज्यांना प्रिमिअम वैशिष्ट्यांसह अधिक आकर्षक करण्यात आले आहे. हॅरियर #DARK आणि सफारी #DARK मध्ये टॉप-ऑफ-द-लाइन प्रगत वैशिष्ट्यांसह विभागामधील पहिलीच अग्रणी वैशिष्ट्ये आहेत, जसे फ्रण्ट व रिअर एलईडी डीआरएलवर वेलकम व गुडबाय सिग्नेचर अॅनिमेशन, फ्रण्टला सेंटर पोझिशन लॅम्प आणि अधिक सुरक्षिततेसाठी ड्रायव्हर नी एअर बॅग. अॅडवान्स्ड हार्मन ऑडिओवॉरएक्स असलेल्या १० जेबीएल स्पीकर्ससह ऑडिओ अनुभवाला नव्या उंचीवर नेण्यात आले आहे, तर ऐरो इन्सर्टस् आणि आकर्षक पियानो ब्लॅक ग्रिल असलेल्या आर१९ अलॉई व्हील्ससह आकर्षकता अधिक वाढवण्यात आली आहे.
दोन्ही मॉडेल्स ड्युअल झोन फुली ऑटोमॅटिक टेम्परेचर कंट्रोल, टच-आधारित सेंट्रल कंट्रोल पॅनेलसह मल्टीफंक्शन आणि लेदरेट सीट्ससह हेडरेस्ट्सवर कोरलेले #DARK लोगो अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांच्या माध्यमातून लक्झरीअस व आमरादायी ड्रायव्हिंग अनुभव देतात. तसेच, लांबच्या प्रवासादरम्यान अधिक आरामदायीपणासाठी सफारी #DARKच्या दुसऱ्या रांगेतील आसनामध्ये कम्फर्ट हेडरेस्ट्स आणि अधिक आरामदायीपणा व सोयीसुविधेसाठी दुसऱ्या रांगेत वेन्टिलेटेड सीट्स आहेत. ही प्रिमिअम वैशिष्ट्ये आणि विशेष #DARK स्टायलिंग घटक जसे बोल्ड ऑबेरॉन ब्लॅक एक्स्टीरिअर्स, ब्लॅकस्टोन इंटीरिअर थीम आणि पियानो ब्लॅक असेंट्स यासह हॅरियर #DARK आणि सफारी #DARK त्यांच्या संबंधित विभागांमध्ये लक्झरी व आकर्षकतेला नव्या उंचीवर नेतात.