नवीन #TakeMySPOT मोहिमेने एका खेळकर ट्विस्टद्वारे वाढवली संदेशाची रंजकता
बेंगळुरू, : सौंदर्याच्या सकारात्मक व्याख्येला आत्मसात करणाऱ्या विमेन्स T20 लीगच्या उद्घाटनपर पर्वादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) शी साधलेल्या सहयोगाला मिळालेल्या नेत्रदीपक यशानंतर अग्रगण्य वेलनेस ब्रॅण्ड हिमालया वेलनेसने चालू सीझनमध्येही कंपनीची टीमबरोबरची भागीदारी सुरू ठेवण्याची घोषणा केली आहे. यावर्षी #TakeMySPOT या जाहिरातीचा केंद्रबिंदू आपल्या कार्यक्षेत्रांमध्ये कष्टाने मिळविलेले स्पॉट्स आणि यश साजरा करण्यावर असणार आहे. मोठ्या कष्टांनी प्राप्त केलेल्या या जागा अर्थात स्पॉट्स तुमच्याकडून कुणीही काढून घेऊ शकत नाही आणि चेहऱ्यावरच्या नकोशा स्पॉट्सची काळजी घेण्यासाठी हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस वॉश आणि फेस केअर उत्पादनश्रेणी आहे, हा संदेश या चटपटीत जाहिरातीच्या मदतीने हिमालयाने दिला आहे.
हिमालया वेलनेस कंपनीचे बिझनेस डिरेक्टर श्री. राजेश कृष्णमूर्ती या भागीदारीविषयी आपला उत्साह व्यक्त करत म्हणाले, “२०२३ साली विमेन्स प्रीमियर लीगबरोबर केलेल्या भागीदारीला मिळालेले यश या वर्षीच्या पर्वामध्येही हा सहयोग सुरू ठेवण्यास प्रेरणादायी ठरले. #TakeMySPOT मोहिमेमध्ये क्रिकेटर्सच्या साथीने दानिश सैतच्या उत्साहपूर्ण व्यक्तिमत्वाला सामील करून घेणेही आमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आहे, ज्यामुळे या जाहिरातीमधून नव्या हिमालया डार्क स्पॉट क्लिअरिंग टर्मरिक फेस वॉश आणि फेस केअर रेंजच्या साथीने कठोर डागांची समस्या चर्चेमध्ये आणताना त्याला विनोदाची आणि थोड्या रहस्यमयतेची जोड मिळाली.”
या प्रसंगी बोलताना रॉयल चॅलेंडर्स बेंगळुरू (RCB) चे व्हाइल प्रेसिडंट आणि हेड राजेश मेनन म्हणाले, “दुसऱ्या पर्वामध्ये प्रवेश करताना हिमालयाबरोबर आपली पार्टनरशीप विस्तारत असल्याचा आम्हाला आनंद आहे. दोन्ही ब्रॅण्ड्सच्या गाभ्याशी समावेशकता आणि विविधता आणि समाजावर सकारात्मक परिणाम करणाऱ्या कार्यांसाठीची असलेली आत्मीयता हीच समान तत्वे आहेत.”
या मोहिमेविषयी आणि उत्पादनाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी कृपया या लिंकला भेट द्या: Himalaya Dark Spot Clearing Turmeric Face Wash x RCB | WPL 2024 | TakeMySPOT______________