- इश्यू साइज – प्रत्येकी 10 रुपयांचे 56,64,000 इक्विटी शेअर्स
- इश्यू साइज – 65 कोटी रुपये – 40.21 कोटी रुपये
- प्राइस बँड – 70 रुपये – 71 रुपये
- मार्केट लॉट साइज – 1,600 इक्विटी शेअर्स
मुंबई, 20 फेब्रुवारी, 2024 – पूर्व फ्लेक्सीपॅक लिमिटेड, फ्लेक्सिबल पॅकेजिंग सोल्यूशन्सच्या अग्रगण्य प्रदात्यांपैकी एक ने, असलेल्या 27 फेब्रुवारी 2024 रोजी प्रारंभिक सार्वजनिक ऑफर सह सार्वजनिक करण्याची योजना जाहीर केली आहे. कंपनीने या आयपीओद्वारे अप्पर बँड किंमतीवर 40.21 कोटी रुपये उभे करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, व त्याचे शेअर्स एनएसई इमर्ज प्लॅटफॉर्मवर सूचीबद्ध केले जाणार आहेत.
इश्यू साइज 56,64,000 इक्विटी शेअर्स असून अंकित मूल्य प्रत्येकी 10 रुपये आहे.
इक्विटी शेअर वाटप
- पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) अँकर भाग – 15,16,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
- पात्र संस्थात्मक खरेदीदार (क्यूआयबी) – 10,52,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
- गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (एनआयआय) – 8,44,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
- किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदार (आरआयआय) – 19,00,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
- मार्केट मेकर – 3,48,800 इक्विटी शेअर्सपर्यंत
आयपीओ मधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनीने शेड्युल्ड कमर्शिअल बँकांकडून घेतलेल्या सध्याच्या कर्जाची परतफेड, वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट खर्चाची पूर्तता करण्यासाठी केला जाईल. अँकर भागासाठी निविदा 26 फेब्रुवारी 2024 रोजी उघडेल आणि इश्यू 29 फेब्रुवारी 2024 रोजी बंद होईल.
होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत. लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या इश्यूचे रजिस्ट्रार आहेत.
कंपनीचे अध्यक्ष आणि नॉन–एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राजीव गोयंका म्हणाले, “आगामी आयपीओची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. प्लास्टिक उद्योगात मजबूत पाय रोवणारी आणि विस्तृत ग्राहक आधाराला वैविध्यपूर्ण पॅकेजिंग सोल्यूशन्स प्रदान करणारी समर्पित सेवा असलेल्या पूर्व फ्लेक्सीपॅक लिमिटेड दर्जेदार उत्पादने देण्यासाठी कटिबद्ध आहे. कामाप्रती असणाऱ्या आमच्या अढळ बांधिलकीमुळे तसेच लवचिक पॅकेजिंग सामग्रीच्या ट्रेडींग आणि वितरणातील आमच्या मजबूत सहभागामुळे आम्हाला धोरणात्मक भागीदारी आणि उत्कृष्टतेसाठी प्रेरित बाजारपेठेत मजबूत उपस्थिती स्थापित करण्यास अनुमती मिळाली आहे.
जमा झालेला निधी प्रामुख्याने व्यावसायिक बँकांकडून विद्यमान कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि आमच्या कंपनीच्या कार्यशील भांडवलाच्या गरजा भागविण्यासाठी जाईल. आम्ही उद्योगांमध्ये निरंतर वाढ आणि शाश्वततेच्या शक्यतांबद्दल उत्साहित आहोत.”
होलानी कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्री अशोक होलानी म्हणाले, “पूर्व फ्लेक्सीपॅक लिमिटेडचा आयपीओ प्लास्टिक उत्पादन उद्योगातील एक महत्त्वपूर्ण माइलस्टोन आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रवासाचा भाग बनताना आनंद होत आहे. भक्कम प्रतिष्ठा आणि प्लास्टिक-आधारित उत्पादनांच्या वैविध्यपूर्ण श्रेणीसह, कंपनीचे नाविन्य पूर्ण आणि गुणवत्तेच्या आश्वासनाप्रती बांधिलकी ठळकपणे दिसून येते. आम्ही पूर्व फ्लेक्सीपॅक लिमिटेडला भविष्यात निरंतर यश आणि वाढीसाठी शुभेच्छा देतो.”