अरेन्ज मॅरेज ही लव स्टोरी बानू शकते का …. ‘ऊन सावली’ चे टीजर पोस्टर रिलीज
मुंबई : ऊन सावली चित्रपटाच्या ‘टायटल सॉंग’ ला मिळालेला उस्फुर्त प्रतिसाद पाहता आज चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर लाँच करण्यात आले. ऊना मुळे लागणारे चटके आणि सावली ची शीतलता दोन्ही प्रेमाच्या रूपात पाहायला मिळणार आहे. आम्ही दोघी, टाईमपास २, फेम ऍक्टर भूषण प्रधान आणि त्यांच्या सोबत वाळवी आणि झिम्मा २ असे बॅक टू बॅक हिट सिनेमा देणारी एक्टरेस शिवानी सुर्वे ह्या दोघांची जोडी पाहायला मिळणार आहे.
‘एक अरेन्ज मॅरेज ही अद्भुत लव स्टोरी असू शकते’ ह्या वाक्यात ‘ऊन सावलीचे’ गूढ लपलेले आहे. प्रेक्षकांसाठी प्रेमाचा आगळा वेगळा आनंददेणारा, हळुवार स्पर्श करणारा असा हा चित्रपट आहे. आज ह्या चित्रपटाचे पोस्टर आणि टीजर जाहीर करण्यात आले. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारे हे सुंदर जोडपं बरच काही सांगू पाहत आहे, बरच काही बोलू इच्छित आहेत.
‘ऊन सावली’ ह्या चित्रपट मध्ये प्रणय आणि आन्वीची प्रेमकथा आहे. प्रणयला लग्न करायचं नाही आणि दुसरीकडे अन्वीला लग्न करायचं नाही पण हे ती तिच्या आईला सांगू शकत नाही म्हणून ते दोघेही त्यांच्या पालकांच्या मनाचा विचार करता लग्नाला होकार देतात. आणि एक दिवस असा क्षण येतो जेव्हा आन्वी आणि प्रणय त्यांच्या कुटुंबियांसोबत एकमेकांना भेटतात. प्रणयला पहिल्या नजरेतच आन्वी आवडते. परंतु आन्वीचा विरोध हा कायम आहे. आज ‘व्हॅलेन्टाईन्स डे’ च्या दिवशी ‘ऊन सावली’ ह्या चित्रपटाचे टायटल सॉंग नकुल देशमुख आणि श्रिया जैन ह्यांनी गायिले आहे व अल्ट्रा म्युजिक द्वारा लाँच करण्यात आले आहे. गाणे येताच प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. हे गाणे लोकांच्या मनात आणि मुखावर गुणगुणताना पाहायला मिळत आहे.
तिकीट विंडो पिक्चर्स बॅनर अंतर्गत समीर शेख द्वारा चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे . चित्रपटाची कथा अभय वर्धन यांनी लिहिली आहे. तसेच निर्देशन दिवाकर नाईक यांनी केले आहे. चित्रपटा मध्ये म्युजिक सार्थक नकुल यांनी संगीतबद्ध केले आहे. तसेच नकुल देशमुख आणि श्रिया जैन ह्यांनी हे गाणे गायिले आहे . अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री शिवानी सुर्वे हे प्रमुख भूमिका साकारत आहेत. तसेच अजिंक्य ननवरे, राज सरनागत, अंकिता भोईर, विकास हांडे, श्वेता कामत, प्रिया तुळजापूरकर आणि मनाली निकम ह्याचा देखील समावेश आहे. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिले गाणे एवढे हिट झाले आहे की चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. टीजर पाहिल्यावर नक्कीच ह्या दोघांमधील ऊन सावलीचा खेळ पाहण्याची लगबग प्रेक्षकां मध्ये पाहायला मिळणार आहे.