–अक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया झालेल्या एका चार वर्षीय मुलीवर यशस्वी उपचार करण्यात आले
–बाल कर्करोगाशी लढा देताना हॉस्पिटलकडून मिळालेला आधार हाच कुटुंबासाठी एकमेव आशेचा किरण होता
मुंबई, 15 फेब्रुवारी, 2024:
प्रतिकूलतांविरुद्ध आणखी एक वैद्यकीय लढा जिंकत नारायण हेल्थ द्वारा व्यवस्थापित SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल चार वर्षीय हुमेरासाठी आशेचा किरण बनून आले. हुमेरा ही चार वर्षांची चुणचुणीत मुलगी आहे, जिला ब्लड कॅन्सरचा एक प्रकार अॅक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (ALL) असल्याचे निदान झाले होते.
अमरावती येथे राहणाऱ्या हुमेराच्या कुटुंबाला तिच्या उपचारांसाठी दूर दूर प्रवास करून जावे लागत होते. पण, इतके कष्ट सोसून देखील आपली मुलगी बरी होईल या आशेने ते आपल्या मोठ्या मुलाला आपल्या शेजाऱ्यांच्या देखरेखीत सोपवून आले होते.
मुंबईतील SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल येथील वरिष्ठ सल्लागार, पेडियाट्रिक हेमेटोलॉजिक ऑन्कोलॉजिस्ट डॉ. रुचिरा मिश्रा म्हणाल्या, “आर्थिक अडचण आणि घरापासून हॉस्पिटल दूर असल्याच्या कारणांमुळे बऱ्याचदा रुग्ण उपचार घेऊ शकत नाही. पण, पेडियाट्रिक ल्युकेमियामध्ये रुग्णांच्या वाचण्याचा दर चांगला असल्याने, SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल आपल्या या निष्ठेवर कायम राहिले की, कोणताही मुलगा उपचारांपासून वंचित राहता कामा नये.”
हुमेराला अनेकदा दवाखान्यात दाखल व्हावे लागले आणि उपचारातील गुंतागुंतीचा सामनाही करावा लागला, पण तिच्या कुटुंबियांनी चिकाटीने हे दिव्य पार पाडले. या अग्निपरीक्षेविषयी बोलताना अमरावती येथे एका मदरशात मौलवी असलेले हुमेराचे वडील हॉस्पिटलने दिलेल्या खंबीर आधाराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले, “मुलीला येथे ठेवले होते, त्या दरम्यान या हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांच्या फूड कूपन्सचा आम्हाला खूप उपयोग झाला. येथील डॉक्टर केवळ वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून आमची एकमेव आशा होते असे नाही तर ते निराशेच्या काळात आम्हाला उभारी देणारा आमचा मोठा आधार देखील होते.”
त्यांना पुस्ती जोडत हुमेराची आई म्हणाली, “तो काळ खरोखर कसोटीचा होता. आम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या खचलो होतो. पण येथील डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी यांनी निरंतर आम्हाला आधार दिला आणि धीर दिला, ज्यामुळे आम्ही या दिव्यातून पार होऊ शकलो.”
आज, किमोथेरपीनंतर एका वर्षाने हुमेरा आपल्या चिकाटीची साक्ष देत आहे, ती पुन्हा शाळेत जाऊ लागली आहे आणि सगळ्यांकडून कौतुक मिळवत आहे. या संपूर्ण उपचार प्रक्रियेदरम्यान तिची एकच कुरुकुर होती, ‘शाळा आणि आपल्या लाडक्या भावाची खूप आठवण येते.’
प्रतिकूलतांना न जुमानता, नारायण हेल्थ द्वारा व्यवस्थापित SRCC चिल्ड्रन्स हॉस्पिटल आज गौरव अनुभवत आहे आणि आशा, उपचार व नवीन शक्यतांनी भरलेले भविष्य देऊ करत आहे.