मुंबई, NHI NEWS – हिमालया वेलनेस कंपनी या भारतातील आघाडीच्या वेलने ब्रॅन्ड्स पैकी एक असलेल्या कंपनी तर्फे आज त्यांच्या बहुप्रतिक्षित अशा २०२४ च्या मुस्कान उपक्रमाची सुरुवात केल्याची घोषणा करण्यात आली. स्माईल ट्रेन इडियाच्या सहकार्याने संपूर्ण देशभरातील ५०० हून अधिक जिल्ह्यांध्ये १८०० हून अधिक दुभंगलेल्या ओठांवर आणि टाळूंवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर या मुलांमध्ये स्मितहास्य पसरवण्याच्या उद्देशाने आणि मानवतावादी दृष्टिकोनातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या वेळी क्रिकेट मधील आयकॉन युवराज सिंग याने या उपक्रमाला सहकार्य केले असून तो सुध्दा मुलांमध्ये दुभंगलेल्या ओठ आणि टाळू ने त्रस्त मुलांमध्ये जागरुकता निर्माण करत आपले छोटे योगदान देण्यासाठी ‘एक नयी मुस्कान’ ला सहकार्य केले आहे.
या वेळी आयोजित कार्यक्रमात युवराज सिंग ने आपल्या आयुष्यातील अनुभव सांगितले आणि दुभंगलेल्या ओठ व टाळूने त्रस्त मुले कशा प्रकारे त्यांचे संपूर्ण आयुष्य हे सामाजिक कलंक मागे टाकून चांगल्या पध्दतीने जग कशा प्रकारे जगू शकतात या विषयी जागरुकता निर्माण केली. हिमालया वेलनेस कंपनी ने स्माईल ट्रेन या जगातील क्लेफ्ट वर लक्ष देणार्या सर्वांत मोठ्या सामाजिक संस्थेबरोबर भागीदारी केली असून या संस्थे तर्फे जन्मजात दुभंगलेल्या टाळू आणि ओठांवर १०० टक्के मोफत शस्त्रक्रिया केली जाते. यामुळे गेल्या ८ हून अधिक वर्षांपासून संस्थेतर्फे गरीब मुलांना आरोग्यपूर्ण स्मितहास्य निर्माण करण्यास मदत झाली आहे.
यावेळी बोलतांना हिमालया वेलनेस कंपनी च्या कन्झ्युमर प्रॉडक्ट्स डिव्हिजन चे बिझनेस डायरेक्टर श्री. रमेश कृष्णमूर्ती यांनी सांगितले “ लीप बाम क्षेत्रातील (बाजारपेठेतील) एक आघाडी मिळवलेले उत्पादक म्हणून हिमालया ला गुणवत्ता आणि परिणामकारकतेसाठी नियमितपणे निकष तयार करतांना आनंद होत आहे. दरवर्षी आम्ही आमच्या मौल्यवान ग्राहकांमध्ये ब्रॅन्ड विषयी प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि आम्ही हे सुनिश्चित करत असतो की हिमालया लिप बाम हा लीपकेअर मध्ये प्राधान्याचा ब्रॅन्ड बनेल. मुस्कान नी आमच्या हृदयात स्थान मिळवले आणि यामुळे अनेक मुलांना आरोग्यपूर्ण आणि आनंददायी जीवन हे क्लेफट रिपेअर सर्जरी नंतर मिळाल्याने समृध्द अनुभव प्राप्त होतो. स्मितहास्य हे आनंदाचे प्रतीक असते आणि ‘एक नयी मुस्कान’ च्या माध्यमातून आम्ही मुलांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आणि परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सहकार्य करत आहोत. आम्ही या उपक्रमाच्या माध्यमातून आमचे घोषवाक्य ‘खुश रहो खुशहाल रहो’ आणि आमचा दृष्टिकोन ‘वेलनेस इन एव्हरी होम, हॅप्पीनेस इन एव्हरी हार्ट’ पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहोत.”
२०१६ मध्ये सेवाभावी संस्था असलेल्या स्माईल ट्रेन इंडिया बरोबर सहकार्य करुन दुभंगलेल्या ओठ आणि टाळूने ग्रस्त मुलांच्या चेहेर्यावर हास्य निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. हिमालया कडून प्रत्येक प्रिमियम लिपकेअर पॅकच्या खरेदी नंतर ५ रुपये हे क्लेफ्ट सर्जरी साठी दान केले जातात.
भारतीय क्रिकेट आयकॉन युवराज सिंग म्हणतो “ मुलांच्या आरोग्यातच आपले भविष्य लपलेले आहे आणि त्यांच्या खर्या आनंदापासून त्यांना कोणीच वंचित ठेऊ शकत नाही. ‘मुस्कान’ उपक्रम हा क्लेफ्टने त्रस्त असलेल्या मुलांच्या चेहेर्यावर हास्य निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आला असून या महत्त्वपूर्ण अशा कारणासाठी एक महत्त्वपूर्ण आहे. यातून मुलांच्या उज्ज्वल भवितव्याची गॅरेंटी तर मिळतेच पण त्याच बरोबर त्यांच्या परिवारावर सकारात्मक परिणामही होतांना दिसतो. आनंद आणि हास्य फुलवण्याला वाहून घेतलेल्या अशा उपक्रमाचा एक भाग होणे माझ्यासाठी आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे.”
या उपक्रमाचे महत्त्व विषद करतांना स्माईल ट्रेन च्या सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आणि एशियाच्या रिजनल डायरेक्टर ममता कॅरोल यांनी सांगितले “ दुभंगलेले टाळू आणि ओठ यांमुळे मुलांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असतो, त्यामुळे त्यांना खाणेपिणे, श्वास घेणे आणि बोलणे या समस्यांसह कधीकधी सामाजिक दुर्लक्ष आणि एकलकोंडेपणाचा त्रास भोगावा लागतो. वेळेत सर्जरी करुन क्लेफ्टशी संबंधित उपचार घेतल्यास मुलाचा चेहेरा तर बदलतोच पण त्याच बरोबर सध्याच्या आरोग्य समस्या दूर होऊन त्यांच्या जीवनाची गुणवत्ता वाढते. सर्जरीला उशीर केल्यास बोलतांना, ऐकतांना त्रास होऊन मानसिक आजार जडण्याची भिती असते. मुस्कान आणि हिमालया वेलनेस कंपनी बरोबरच्या आमच्या भागीदारीमुळे आम्ही लोकांमध्ये क्लेफ्ट्स विषयी जागरुकता निर्माण करुन सर्जरीज मोफत करुन भारतातील अधिकाधिक मुलांसाठी सर्वसमावेशक उपचार उपलब्ध करुन देत आहोत.”