नवी दिल्ली : चॅम्पियन्स जन्म घेत नाहीत, ते घडतात आणि भारतातील सर्वांत मोठी पेण्ट व डेकॉर कंपनी एशियन पेंट्सच्या नवीन जाहिरातीमध्ये एकत्र आलेल्या तिन्ही सुपरस्टार्सच्या बाबतीत हे खरे आहे. भारतातील प्रख्यात स्टार्स व ब्रॅण्ड अँबॅसडर्स रणबीर कपूर आणि पी. व्ही. सिंधू एशियन पेंट्स ‘स्मार्टकेअर हायड्रोलॉक’ लाँच करण्यासाठी एकत्र आले आहेत. हे उत्पादन म्हणजे कंपनीचा इंटरिअर वॉटरप्रूफिंग चॅम्पियन आहे. हायड्रोलॉक हे रेडी-टू-यूज इंटिरिअर वॉटरप्रूफिंग सोल्युशन असून, ते सहज उपयोग करता येऊ शकते.
एशियन पेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सिंगले नवीन लाँच आणि टीव्हीसीबद्दल म्हणाले, “भिंतींचे वॉटरप्रूफिंग हे तोडफोड करून करावे लागणारे अत्यंत त्रासदायक काम आहे आणि ही समस्या संपूर्णपणे सोडवण्यासाठी ही तोडफोड करण्यास प्रत्येक जण तयार असेलच असे नाही, हे आम्हाला प्रचंड संशोधन आणि ग्राहकांशी संवाद यांतून समजले. ही तफावत भरून काढण्यासाठी आम्ही इंटिरिअर वॉटरप्रूफिंग स्पेशालिस्ट उत्पादन विकसित केले. हे उत्पादन वापरण्यास सोपे आणि अत्यंत परिणामकारक आहे. या चॅम्पियन उत्पादनाचे क्रांतिकारी स्वरूप बघता, रणबीर कपूर व पीव्ही सिंधू यांचा या उत्पादनासोबतचा सहयोग जाहीर करतानाही आम्हाला खूप आनंद होत आहे. आमचे चॅम्पियन इंटिरिअर वॉटरप्रूफिंग उत्पादन- स्मार्टकेअर हायड्रोलॉक- लाँच करण्यासाठी त्यांच्याशी सहयोग करता आला याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो.”
अंतर्गत वॉटरप्रूफिंग समस्यांवर सोपा व प्रभावी उपाय देणारे स्मार्टकेअर हायड्रोलॉक ओलसरपणा व भिंती फुगण्यापासून संरक्षणासाठी ३ वर्षांची वॉरंटी देते.
एशियन पेंट्सच्या स्मार्टकेअर हायड्रोलॉकची रणबीर कपूर व पीव्ही सिंधू यांची जाहिरात बघण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा: https://www.youtube.com/watch?v=N-CkQrEPO2g