पर्यटन संचालनालय (DoT), महाराष्ट्र शासन
• ५०+ ठिकाणी ५०+ इव्हेंट्सच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सांस्कृतिक दृष्टिकोन जगासमोर आणणार
मुंबई – , २०२४ – २० ते २८ जानेवारी दरम्यान, मुंबई फेस्टिवल,२०२४ दैदीप्यमान ‘स्वप्नांच्या शहराला’ उजळून टाकणार आहे. या कालावधीतील मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांचा आणि आकर्षक उपक्रमांचा सर्व तपशील आम्ही सादर करत आहोत. आज , श्री. गिरीश महाजन, मा. मंत्री (ग्रामविकास व पर्यटन), महाराष्ट्र शासन यांनी श्री. आनंद महिंद्रा, अध्यक्ष – मुंबई फेस्टिवल सल्लागार समिती, श्रीमती जयश्री भोज, सचिव, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन, यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमांच्या स्थळांची यादी जाहीर केली. कार्यक्रमाच्या रुपरेषेची इत्यंभूत माहिती प्रदान केली आणि या भव्य सोहळ्याची शोभा द्विगुणित करण्यासाठी सहभागी होणाऱ्या नामांकित सिने कलाकारांची नावे सांगितली.
श्री, दीपक केसरकर, मा. पालकमंत्री, मुंबई आणि श्री मंगल प्रभात लोढा, मा. पालकमंत्री, मुंबई उपनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. यावेळी मुंबई फेस्टिवलच्या यशामध्ये महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व भागीदारांचा सत्कार करण्यात आला, ज्यामध्ये एसबीआई, साईनपोस्ट, एरिअन ग्रुप, इज माय ट्रीप, बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड, आणि प्रोजेक्ट मुंबईचा समावेश होता. हा सांस्कृतिक उपक्रम तुम्हाला महाराष्ट्राच्या अनोख्या प्रवासाला घेऊन जाईल, ज्यामध्ये विविध कार्यक्रम, अनुभव आणि प्रसिद्ध व्यक्तिमत्वांची साथ असेल. मुंबई फेस्टिवल २०२४ ’प्रत्येकजण आमंत्रित आहे’ या थीमसह एकतेची भावना दर्शवेल. ज्याचा उद्देश सर्व समुदायांना एकत्र आणून, महाराष्ट्राची उत्कृष्ट सांस्कृतिक परंपरा जगासमोर आणण्याचा असेल. मुंबई फेस्टिवलच्या माध्यमातून, प्रत्येकजण संगीत, चित्रपट, बीच सेलिब्रेशन, खाद्य महोत्सव आणि इतर कार्यक्रमांद्वारे या अनोख्या उत्सवाचे साक्षीदार होतील. अधिक माहितीसाठी तपशीलवार कार्यक्रमपत्रिका पहा.
मा. पर्यटन आणि ग्रामविकास मंत्री, श्री गिरीश महाजन, या महोत्सवाबद्दलचा उत्साह व्यक्त करताना म्हणाले, “मुंबई फेस्टिवल,२०२४ हा महाराष्ट्राचा समृद्ध वारसा आहे. हा उत्सव मुंबईच्या सांस्कृतिक भव्यतेची झलक देतो आणि आम्ही सर्वांना या प्रवासात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो. भावनांना मूर्त रूप देणारी, नवीन संबंध जागृत करणारी आणि महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाला सलाम करणारी अभूतपूर्व कलाकृती तयार करण्यात आम्ही आमचे समर्पण, उत्साह आणि उत्कटता गुंतवली आहे. आम्हाला विश्वास आहे की, हा कार्यक्रम पर्यटकांचा मुंबईकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल आणि त्यांना मातृभूमीचा नव्याने शोध घेण्यास प्रेरित करेल.’’
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन सचिव श्रीमती जयश्री भोज म्हणाल्या, “महाराष्ट्र शासनाचे पर्यटन सचिव या नात्याने, मुंबई फेस्टिवल समाजाच्या सर्जनशील आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला कसे प्रोत्साहन देते हे पाहून मला आनंद होतो. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे वैशिष्ट्य असलेल्या या सामूहिक प्रयत्नात सहकार्य आणि विविधतेची भावना दिसून येते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात अविरत मेहनत करणाऱ्या प्रत्येक सहभागी, भागीदार आणि सहयोगी यांचे मी मनापासून आभार मानते. आपल्या राज्याची विविधता आणि संपन्न वैभव साजरे करण्यासाठी एकत्र येत असताना, आपण या उत्सवाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया.”
मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्ष श्री आनंद महिंद्रा म्हणाले, “मुंबई फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राच्या अद्वितीय आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक समृद्धीचे चित्रण करण्यात आले आहे. प्रत्येक लहानातील लहान गोष्टीकडे बरकाव्याने लक्ष दिले गेले आहे. महाराष्ट्राची अतुलनीय समृद्धता सादर करण्यासाठी होणाऱ्या सर्व सादरीकणापासून ते भव्य प्रदर्शनांपर्यंत तुम्ही पाहत असलेला प्रत्येक पैलू, असंख्य तासांची मेहनत, उत्कटता आणि वचनबद्धता प्रतिबिंबित करते. विचारांच्या कक्षा रूंदवणाऱ्या एका उत्सवाचे आयोजन करताना आम्हाला आनंद होत आहे आणि मला विश्वास आहे की, आज सादर केलेली कार्यक्रमपत्रिका एका अविस्मरणीय उत्सवासाठी आम्ही घेतलेल्या परिश्रम आणि प्रयत्नांचा आरसा असेल.
“मुंबई एक त्यौहार है।” हे मुंबई फेस्टिवल,२०२४ चे थीम सॉन्ग आहे. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी नृत्यदिग्दर्शित केलेले ही गीत, अतिशय लोकप्रिय झाले आहे. प्रत्येकजण याच्या तालावर थिरकत आहे. ‘मुंबई एक त्यौहार है हुकस्टेप चॅलेंज’ने सोशल मीडियावर धमाल केली आहे, यावर इन्फ्लुएन्सर्स आणि इंस्टाग्राम युजर्स आपले नृत्यकौशल्य सादर करत आहे. शमीर टंडन यांनी संगीतबद्ध केलेल्या, या गाण्यात सुखविंदर सिंग, शंकर महादेवन, हर्षदीप कौर, फाल्गुनी पाठक, अवधूत गुप्ते यांच्यासारख्या सुप्रसिद्ध गायकांचा आवाज आणि धारावी ड्रीम प्रोजेक्टचे लयबध्द बीट्स आहेत. या मुंबापुरीने या गाण्यावर मनापासून प्रेम केले आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक कोपरा काबीज केला आहे.
महाराष्ट्र शासनाने विझक्राफ्ट एंटरटेनमेंट एजन्सी प्रा. लि. कंपनीकडे मुंबई फेस्टिवलच्या व्यवस्थापनेची धुरा सोपवली आहे.
मुंबई फेस्टिवलबद्दल:
मुंबई फेस्टिवलच्या प्रथम आयोजनामध्ये, हा ०९ दिवसीय भव्य सोहळा, मुंबईच्या विविध लोकप्रिय ठिकाणी एक केंद्रबिंदू म्हणून साजरा होईल. मुंबईची असीमित ऊर्जा आणि विविधतेत नटलेल्या एकतेचे दर्शन घडवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवात विविध कार्यक्रम, सादरीकरण आणि अनुभव यांचे मिश्रण असेल. मुंबई फेस्टिवल सल्लागार समितीचे अध्यक्षपद भूषवत श्री. आनंद महिंद्रा यांच्या नेतृत्वामध्ये, सांस्कृतिक वातावरणात मुंबईचा समृद्ध वारसा आणि चैतन्याचे प्रतिबिंब टिपण्याचे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. विविधतेत नटलेल्या सर्व समाजांना एकत्रित गुंफून, सांस्कृतिक एकोपा निर्माण करण्याची ग्वाही मुंबई महोत्सव देतो. अधिक माहितीसाठी आणि कार्यक्रमाच्या वेळापत्रकासाठी, कृपया https://mumbai-festival.com/ ला भेट द्या किंवा इंस्टाग्राम @mumbai_festival वर आम्हाला फॉलो करा.
पर्यटन संचालनालयाबद्दल:
पर्यटन संचालनालय, महाराष्ट्र पर्यटनाची प्रमुख संस्था, राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध पर्यटन योजना,प्रसिद्धी व प्रचाराचे कार्य करते. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या स्थापनेपासून, राज्याने अनेक टप्पे गाठले आहेत आणि विविध उपक्रमांच्या मदतीने अनेक शिखरे गाठली आहेत.
मुंबई फेस्टिवल,२०२४ मध्ये असणाऱ्या या काही कार्यक्रमांचा यात समावेश आहे (इव्हेंट कॅलेंडर दिले आहे):
उदघाटन समारंभ:
मुंबई फेस्टिवल,२०२४ चा आरंभ करताना, काळा घोडा आर्ट फेस्टिवलसह, उद्घाटन समारंभ शहराच्या दैदीप्यमान वारशाचा एक समृद्ध प्रवास सुरू करतो. या उत्साहात सहभागी होण्यासाठी ‘प्रत्येकजण आमंत्रित आहे’!
दिनांक
वेळ
स्थळ
२० जानेवारी २०२४
सायं ६:00 ते रात्रौ १०:००
क्रॉस मैदान गार्डन
पर्यटन परिषद
पर्यटन परिषदेमध्ये मा. पंतप्रधानांचे मिशन ‘LiFE- लाईफस्टाइल फॉर एनवायरमेन्ट’ आणि पर्यटन मंत्रालयाच्या ‘ट्रॅवल फॉर लाईफ’ या उपक्रमावर आधारित, जागतिक पटलावर उपलब्ध असणाऱ्या पर्यटन संधींवर चर्चा केली जाईल. मुंबईतील एमआयसीई, कार्यक्रम, विवाह उद्योग, पर्यटन, हॉटेल्स आणि प्रेक्षणीय स्थळांवर भर देऊन, या क्षेत्रातील वाढ आणि सहयोगाला चालना देण्यासाठी ही परिषद एक मुख्य व्यासपीठ असेल.
दिनांक
वेळ
स्थळ
२४ जानेवारी, २०२४
सकाळी ०९:०० – सायं ६:००
ग्रँड हयात, कलिना
टर्बो स्टार्ट – फॉरएव्हर प्लॅनेट स्टार्टअप चॅलेंज,२०२४
हा उपमक्र मुंबई फेस्टिवल २०२४ चा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, जो नावीन्य आणि उद्योजकता याद्वारे शहराची ओळख पुनःनिर्माण करेल. टर्बोस्टार्टच्या सहकार्याने, स्टार्टअप इकोसिस्टममधील जागतिक उमेदवार म्हणून, हा कार्यक्रम एक महत्त्वाचा पैलू आहे. उद्योग, शैक्षणिक आणि सामुदायिक पार्टनर्सच्या सहकार्याने, स्टार्ट-अप मुंबई, मुंबईच्या वैविध्यपूर्ण वातावरणाचा उपयोग करते. ज्यामध्ये स्टार्टअपना प्रशिक्षण, वृद्धी,शाश्वत जीवन आणि पर्यावरण संरक्षण याकरिता योगदान देण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते. युनायटेड नेशन्सच्या सहभागामुळे मुंबई फेस्टिवल अधिकच रोमांचक असेल. मुंबई फेस्टिवल २०२४, नाविन्यपूर्ण शोध आणि टिकाऊपणावर आधारित भविष्यासाठी मुंबईची बांधिलकी अधोरेखित करतो.
दिनांक
वेळ
स्थळ
२५ जानेवारी, २०२४
सकाळी ०९:०० – दुपारी २:००
बीएसई, फोर्ट
मुंबई वॉक्स
मुंबई वॉक्स हा प्रभावी रॅम्प वॉक या मातीच्या सुपुत्रांना सलाम करतो: पोलिस दल, अग्निशमन दल, इलेक्ट्रिक सप्लाय तंत्रज्ञ, शहरातील स्वीपर्स, गटार सफाई कर्मचारी, डॉक्टर, नर्सेस, अग्निशमन कर्मचारी, बेस्ट बस ड्रायव्हर्स, मच्छिमार, चहावाला, डब्बावाला, पोलिस अधिकारी.
दिनांक
वेळ
स्थळ
२५ जानेवारी, २०२४
सायंक ७:०० – रात्रौ १०:००
गेटवे ऑफ इंडिया
क्रिकेट क्लिनिक:
मुंबई फेस्टिवलमधील एक महत्वपूर्ण इवेंट असणारा ठाकूर क्रिकेट स्टेडियम (कांदिवली – पूर्व) येथील क्रिकेट क्लिनिक, प्रत्येकासाठी क्रिकेट प्रशिक्षणाचा एक नावीन्यपूर्ण अनुभव आहे. मुंबईची क्रिकेटचे केंद्रस्थान म्हणून ओळख निर्माण करताना, क्रिकेट प्रशिक्षकांसह मैदानात जाऊन सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या चाहत्यांसाठी आणि पर्यटकांसाठी आयोजित हा खास इव्हेंट.
दिनांक
वेळ
स्थळ
२०आणि २१ जानेवारी
सकाळी ७:०० ते ९:०० |
सकाळी १०:०० ते दुपारी १२:००
ठाकूर क्रिकेट स्टेडियम
(कांदिवली-पूर्व)
पॅरामोटर शो
मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये गेटवे ऑफ इंडिया, ताज, सीएसएमटी, शांती स्तूप आणि धारावी यांसारख्या प्रतिष्ठित स्थळांची अप्रतिम हवाई दृश्ये टिपणारे कुशल कलाकार “अल्टीमेट मोटरस्पोर्ट मालिका” सादर करणार आहेत.
दिनांक
वेळ
स्थळ
२७ जानेवारी, २०२४
सायं ५:०० – ७:००
गिरगाव चौपाटी बीच
चित्रपट महोत्सव
मुंबई फेस्टिवल दरम्यान, पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर्स ‘मुंबई शोकेस’ साजरा करणार आहेत. मुंबईने नेहमीच भारतात आणि परदेशात साकारलेल्या आयकॉनिक सिनेमा संस्कृतीचा हा उत्सव आहे. चित्रपट प्रदर्शनाचे तपशीलवार वेळापत्रक पीव्हीआर-आयनॉक्सच्या वेबसाइटवर उपलब्ध असेल.
दिनांक
वेळ
स्थळ
२० – २४ जानेवारी, २०२४
सायं ७:०० चे शो
संपूर्ण मुंबईतील पीव्हीआर-आयनॉक्स थिएटर्स
संगीत महोत्सव
मुंबई फेस्टिवल, २०२४ मुंबईला अधिक उत्साही बनवण्यासाठी वचनबद्ध आहे. पॉप-अप इव्हेंट कार संपूर्ण शहरात विविध ठिकाणी कॉन्सर्ट करेल आणि संपूर्ण फेस्टिवलदरम्यान, विविध डीजे परफॉर्मन्सद्वारे नागरिकांना अचंबित करेल.
दिनांक
वेळ
स्थळ
१९ – २८ जानेवारी, २०२४
सायं ६:०० नंतर
मुंबईमध्ये विविध ठिकाणी
महामुंबई एक्स्पो – मुंबईची जान
महामुंबई एक्स्पो हे संगीत, नृत्य, पाककृती, कलाकुसर आणि इतर अनेक गोष्टींसह मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचे बहुरंगी प्रदर्शन आहे.
दिनांक
वेळ
स्थळ
२० ते २८ जानेवारी, २०२४
सोम-शुक्र दुपारी ४:०० ते रात्री १०:०० आणि
शनि-रवि दुपारी १:०० ते रात्री १०:०० पर्यंत
एमएमआरडीए मैदान, बीकेसी
बीच फेस्ट
बीच फेस्ट हा एक असा दिवस आहे, जेव्हा सामान्य जनता, एन जी ओ, आणि कलाकार मंडळी मिळून समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, बीच स्पोर्ट्स, योगा आणि समुद्रकिनाऱ्यावरील चित्रपट प्रदर्शनाचा एकत्रितपणे आनंद लुटतील. या पर्यावरणाचा संवर्धन करणाऱ्या उत्सवात आमच्यासोबत सामील होत आहेत, आदरणीय यूनायटेड नेशन्सच्या राजदूत, दिया मिर्झा, ज्या मुंबई फेस्टिवलमध्ये शाश्वततेच्या उपक्रमांसाठी आमच्या समर्थक आहेत. तसेच युनायटेड नेशन्स इंडिया आणि प्रोजेक्ट मुंबईचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित असतील.
दिनांक
वेळ
स्थळ
२० ते २८ जानेवारी, २०२४
योगा, फुटबॉल आणि व्हॉलीबॉल, बीच क्लीनअप आणि
स्क्रीनिंग –
सकाळी ६.०० ते सायंकाळी ७.०० वा
जुहू बीच
अर्थ मुव्ही कोंटेस्ट
मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये युनायटेड नेशन्स इंडिया, एनडीएफसी आणि पीव्हीआर यांच्या सहकार्याने #EarthMovieChallenge सादर केले जाईल. हे चॅलेंज चित्रपट निर्मात्यांना एक असा चित्रपट तयार करण्याचे आव्हान करते, जो शाश्वत जीवन शैलीबद्दल आणि शतकानुशतकांच्या पर्यावरण-नाशामुळे भूमाता तोंड देत असलेल्या आव्हानांबद्दल संवाद साधेल. #EarthMovieChallenge चे मूल्यमापन चित्रपट सृष्टीतील प्रतिष्ठित व्यक्ती आणि सतत पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या परीक्षकांकडून केले जाईल. प्रथम 3 विजेत्यांना त्यांचे चित्रपट समारोप समारंभात सादर करण्याची आणि जजिंग पॅनेलसह इंटर्नशिपची करण्याची संधी मिळेल.
स्क्रीनिंग दिनांक
वेळ
स्थळ
२८ जानेवारी २०२४, समारोप समारंभावेळी
सायं ७:०० नंतर
एमएमआरडीए मैदान, बीकेसी
ग्रँड फिनाले: कॉन्सर्ट फॉर चेंज (समारोप समारंभ):
मुंबई फेस्टिवल २०२४ मध्ये संस्कृती, कला आणि उत्साहाने भरलेल्या ०९ दिवसांच्या समाप्तीच्या अविस्मरणीय समारोप सोहळ्यामध्ये सामील व्हा! ही ग्रँड फिनालेची रात्र म्हणजे प्रेरणा, मनोरंजन आणि मुंबईच्या शाश्वत भविष्यासाठी एकत्रितपणे घेतलेली शपथ असेल.
दिनांक
वेळ
स्थळ
२८ जानेवारी २०२४
सायं ७:०० ते १०:००
एमएमआरडीए मैदान, बीकेसी