Mumbai/NHI
श्री उद्यानगणेश मंदिर शालेय कबड्डी स्पर्धेमधील मुलींच्या गटात एसआयईएस हायस्कूल-माटुंगा, प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, एमसीएम गर्ल्स हायस्कूल-काळाचौकी, उत्कर्ष मंदिर-मालाड तर मुलांच्या गटात मारवाडी विद्यालय-गिरगाव, प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कूल, आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूल-वडाळा आदी संघांनी उपांत्य फेरी प्रवेश केला. चढाई बहाद्दर आर्या देवरकरच्या अप्रतिम खेळामुळे एसआयईएसं हायस्कूलने समता विद्या मंदिरचे आव्हान ३४-७ असे सहज संपुष्टात आणले.
श्री उद्यानगणेश मंदिर सेवा समिती-मुंबई आयोजित मुलींच्या उपांत्यपूर्व फेरीमधील अन्य सामन्यात प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने चुनाभट्टी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलचा ३६-३५ असा, एमसीएम गर्ल्स हायस्कूलने आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलचा ४३-३५ असा तर उत्कर्ष मंदिरने जनता शिक्षण संस्था हायस्कूलचा ३१-१६ असा पराभव केला. मुलांच्या गटात प्रभादेवी म्युनिसिपल सेकंडरी स्कूलने शिशुविहार माध्यमिक विद्यामंदिरवर ४६-२५ असा, मारवाडी विद्यालयाने कुलाबा म्युनिसिपल सेकंडरी स्कूलवर ३३-२५ असा तर आंध्रा एज्युकेशन सोसायटी हायस्कूलने श्री गौरीदत्त मित्तल हायस्कूलवर ५२-३९ असा विजय संपादन करून उपांत्यपूर्व फेरी जिंकली.
*****************************************************************