मुंबई,2ऑगस्ट २०२२ : ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे लोकप्रिय ‘मंगळसूत्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २९ जुलै २०२२ ते २८ ऑगस्ट २०२२ दरम्यान सुरू राहणार आहे. ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे भारतभरातील स्टोअर्समध्ये या काळातच ‘पैंजण – जोडवी महोत्सव’देखील साजरा करण्यात येणार आहे.
आपल्या ग्राहकांच्या खरेदीच्या आनंदात भर घालण्याच्या हेतूने ‘पीएनजी ज्वेलर्स’तर्फे सोन्याच्या मंगळसूत्रांच्या घडणावळीवर २० टक्के, हिर्याच्या मंगळसूत्र पेंडंट्सच्या घडणावळीवर ५० टक्के तर चांदीचे पैंजण व जोडवींच्या घडणावळीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. भारतभरातील ‘पीएनजी ज्वेलर्स’च्या स्टोअर्समध्ये मंगळसूत्र,पैंजण आणि जोडव्यांची असंख्य डिझाईन्स ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत.
आपल्या विविध परंपरांनुसार पैंजण हा भारतीय स्त्रियांसाठी आजवर एक महत्त्वाचा दागिना राहिला आहे. आजही त्याची खासियत आणि सौंदर्य टिकून आहे. पैंजण हा भारतीय नववधूच्या दागिन्यांपैकी एक महत्त्वाचा दागिना आहे. नवजात बालकांनाही पैंजण भेट दिले जाते.
‘पीएनजी ज्वेलर्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ म्हणाले की, “या वर्षी ‘मंगळसूत्र महोत्सवा’ची संकल्पना ही ‘वैविध्यपूर्ण’ अशी आहे. आमचे नवीन मंगळसूत्र कलेक्शन हे जीवनातील विविध प्रसंगांसाठी साजेसे ठरेल. विविध प्रसंगांसाठी परिधान करण्यात येणार्या पोशाखांची वैविध्यता आणि व्याप्ती लक्षात घेऊन आमच्या डिझाईन टीम्सनी फक्त पारंपरिकच नव्हे तर आंतरराष्ट्रीय बाजारातील सध्याच्या ट्रेंडिंग डिझाईन्सपासून प्रेरणा घेऊन ही मंगळसूत्र डिझाईन केलेली आहेत. बाजारात यापूर्वी कधीही न पाहिल्या गेलेली आणि थक्क करणारी अशी ही नावीन्यपूर्ण डिझाईन्स आहेत. मंगळसूत्र हे केवळ अभिमान व आनंदाचे प्रतीक म्हणून नव्हे तर स्टाईल स्टेटमेंट म्हणून परिधान केले जाऊ शकते, हेच या नवीन कलेक्शनद्वारे हे सिद्ध होते.”