मुंबई, : ट्रूक हा उच्च दर्जाची ऑडिओ उत्पादने निर्माण करणारा भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला ऑडिओ ब्रॅण्ड संगीतप्रेमींना, तसेच गेमर्सना पर्वणी देण्यास सज्ज आहे, जेथे आज या ब्रॅण्डने त्यांच्या फ्लॅगशिप गेमिंग टीडब्ल्यूएसमधील नवीन मॉडेल ट्रूक बीटीजी अल्फा लाँच केला आहे. बीटीजी टीडब्ल्यूएस ८९९ रूपये या स्पेशल लाँच किंमतीमध्ये उपलब्ध असेल आणि सामान्य किंमत १२९९ रूपये असेल.
लाँच करण्यात आलेले नवीन उत्पादन ट्रूकच्या अग्रगण्य व गो-टू म्युझिक ब्रॅण्ड म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीकोनाला प्रगत करण्यासाठी सज्ज आहे. ब्रॅण्ड भारतीय ग्राहकांच्या गरजांची प्रभावीपणे पूर्तता करू शकणारी किफायतशीर दरांमधील उच्च दर्जाची उत्पादने डिझाइन करण्याप्रती कटिबद्ध आहे.
ट्रूक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पंकज उपाध्याय म्हणाले, “परवडणारे स्मार्टफोन्स आणि उपलब्ध इंटरनेट सुविधांमुळे भारतात प्रामुख्याने द्वितीय व तृतीय श्रेणीच्या शहरांमधील ऑनलाइन गेमर्समध्ये अपवादात्मक वाढ दिसण्यात आली आहे. आम्हाला आमच्या नवोन्मेष्कारी व किफायतशीर उत्पादनांच्या मदतीने या उदयोन्मुख समुदायाला सर्वोत्तम गेमिंग अनुभव देण्यासाठी मोठी संधी दिसून येत आहे. आमची बर्न टू गेम (बीटीजी) सिरीज खिशावर अधिक भार न पडता गेमिंग-केंद्रित टीडब्ल्यूएसचा शोध घेत असलेल्या भारतीय गेमर्सप्रती समर्पित आहे. ही सिरीज समुदायामध्ये यापूर्वीच हिट ठरली असताना आम्हाला विश्वास आहे की, आमच्या नवीन उत्पादनाला देखील युजर्सकडून तोच प्रतिसाद मिळेल. समुदायाला अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही देशभरात २०० हून अधिक सेवा केंद्रांचे प्रबळ नेटवर्क निर्माण केले आहे, जे सप्टेंबर अखेरपर्यंत ५०० हून अधिक सेवा केंद्रांपर्यंत वाढेल.”
एर्गोनॉमिकली डिझाइन केलेल्या ट्रूक बीटीजी अल्फामध्ये युनिक ट्रान्सपरण्ट डिझाइनसह ७आरजीबी लायटिंग आहे आणि हा टीडब्ल्यूएस जवळपास ४० एमएस* अल्ट्रा लो लेटन्सीसह अल्टिमेट गेमिंग अनुभव देतो. या टीडब्ल्यूएसमध्ये इन्स्टण्ट पेअरिंग टेक्नोलॉजीसह ओपन-टू-पेअर टेक्नोलॉजी आहे, ज्यामधून आधुनिक ब्ल्यूटूथ ५.३ तंत्रज्ञानासह उत्तम स्थिरता व जलद कनेक्शन मिळते. या टीडब्ल्यूएसमध्ये ड्युअल माइक एन्व्हायरोन्मेटल नॉईज कॅन्सलेशन (ईएनसी) आहे, जे गेमर्सना विना व्यत्यय किंवा अडथळ्याशिवाय उच्च दर्जाच्या साऊंडचा आनंद देते. तसेच बीटीजी अल्फा केससह जवळपास ४८ तासांपर्यंत* प्लेटाइम आणि एका चार्जमध्ये १० तासांपर्यंत प्लेटाइम देते आणि या टीडब्ल्यूएसमध्ये टॅप टू कंट्रोलसह सुलभ उपलब्धता आणि एएसी कोडेकसह हाय-फिडेलिटी म्युझिक आहे.