मुंबई, NHI:-घोडपदेव समूहाच्या सहकार्याने आणि समाजसेवक दिलीप वागस्कर यांच्या सौजन्याने घोडपदेव डी पी वाडी श्री कापरेश्वर मंदिर प्रांगणात वय वर्षे 4 ते 10 वयांच्या मुला मुलींना मोफत कपडे वाटप कार्यक्रम पार पडला. ततप्रसंगी शिवसेना युवा नेते निखिल यशवंत जाधव, भाजप भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, उद्योगपती मेहुलशेठ, श्रध्दा वाघमारे, स्मिता साळवी, संगीता मारणे, सुनील डोंगरे, शिवाजी भिलारे, महेशदादा थोरात, माणिक निगडे, राजा म्हात्रे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरुणकुमार वर्पे यांनी केले तर जगदीश नलावडे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमाला समूहाच्या वतीने विलास गुढेकर, विजय लांडे, नागेश नांदोस्कर, श्री सचिन पप्पी शिंदे, राजू तावडे, दत्ता गाढवे, दिनेश शेटे, अजय खांडगे, पांडुरंग गहिने,रुपेश गांगण, शुभम वागस्कर, मनोज शिवले, तुकाराम मारणे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तर या कार्यक्रमाच्या दरम्यान कांच बिल्डिंग, बाबु गेणु नगर परिसरातील लहान मुलांनी समाजसेवक दिलीप वागस्कर यांच्या कार्याचा गौरव म्हणून छोटेखानी सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास किशोर वायकर, सुनील जाधव, सत्यवान सोनवणे,दिलीप लोध, मोहन राणे, सतीश करावडे,राजेश आईर शैला गायकवाड, स्वप्नाली जाधव आदी मान्यवरांनी मोलाचे सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी पार पाडला.
अखेर ओंकार पवार यांनी सर्व उपस्थितांचे आणि घोडपदेव समूहावर प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचे जाहीर आभार प्रकट करून कार्यक्रमाची सांगता केली.