मुंबई : एचडी ह्युंदाई कन्स्ट्रक्शन एक्विपमेंट इंडियाने पायाभूत सुविधा, खाणकाम आणि साहित्य हाताळणी उद्योगात आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आपली अनेक उत्पादने लाँच केली आहेत. अधूनिक हेवी ड्यूटी मायनिंग ऍप्लिकेशनसाठी ग्लोबल एचएक्स सिरीज ५० टन उत्खनन यंत्र
पायाभूत सुविधा विभागातील कंपनीची नाममुद्रा मजबूत करण्यासाठी ८ टन, १४ टन, १५ टन सेगमेंटमध्ये स्मार्ट प्लस उत्खनन यंत्र (एक्साव्हेटर):च्या मालिकेत ३ नवीन मॉडेल्स लाँच करण्यात आली. पायाभूत सुविधा आणि खाण विभागासाठी ३ टन आणि ५ टन पेलोडमधील व्हील लोडरचे २ नवीन मॉडेल लाँच करण्यात आले.
इलेक्ट्रिक फोर्कलिफ्टचे २.५ टन आणि मटेरियल हँडलिंग उपकरण श्रेणीतील ३.० टनचे २ नवीन मॉडेल्सही लाँच करण्यात आले. हे एकूण ४ उत्खनन मॉडेल असून त्यात, २ फोर्कलिफ्ट मॉडेल आणि २ व्हील लोडर लॉन्च करण्यात आले.
याबाबत एचडी ह्युंदाई सीई इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पार्क जिन एसईओजी म्हणाले की, “आम्ही खूप भाग्यवान आहोत की आम्ही आमच्या ह्युंदाई कुटुंबाच्या उपस्थितीत आज नवीन उत्पादने लाँच करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे साक्षीदार होणार आहोत”
दरम्यान ह्युंदाई चे उपाध्यक्ष श्री. राजीव चतुर्वेदी म्हणाले की “नवीन पिढीची उत्पादने ग्राहकांचा आवाज घेऊन त्यांच्या ग्राहकांसाठी मूल्य आणि नफा अधिक आकर्षक बनवण्यासाठी विकसित केली जातात. ही नवीन उत्पादने आमच्या सर्व ग्राहकांना खूश करण्यासाठी आणि ह्युंदाईची नाममुद्रा अधिक मजबूत करण्यासाठी उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि वैशिष्ट्यांसह ऑपरेशनचे उत्कृष्ट अर्थशास्त्र प्रदान करतील.