नवी दिल्ली : 5G Spectrum लिलाव पूर्ण, या कंपन्या देशात पसरवणार 5G चे जाळे टाकणार आहेत. मात्र त्याचबरोबर सरकारी कंपन्या बी एस एन एल, एम टी एन एल ला ठेंगा दाखविण्यात आला. खाजगीकरणाचे भुत डोक्यात गेल्यावर सरकारी यंत्रणा पुर्णपणे मोडीत निघणारच.
40व्या फेरीनंतर 5G Spectrum चा लिलाव अखेर सोमवारी संपुष्टात आला आहे. 5G स्पेक्ट्रममधून आता केंद्र सरकारला तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल यांनी या लिलावात बाजी मारली असून आता संपूर्ण देशात एअरटेल आणि जिओ या दोन्ही कंपन्या 5जी चं जाळं पसरवणार आहेत.
या कंपन्या पसरवणार जाळे
गेल्या सात दिवसांपासून 5G स्पेक्ट्रमचा लिलाव सुरू होता. या लिलावातून सरकारला दीड लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ या दोन कंपन्या देशभरात 5जीचं जाळं पसरवणार असून वोडाफोन आणि आयडिया या कंपन्यांकडून मोजक्या क्षेत्रातच लिलावाला पसंती देण्यात आली आहे. 15 ऑगस्टपर्यंत या 5G विस्तारासाठीच्या अलॉटमेंट करण्यात येणार आहेत.
कधीपर्यंत सुरू होणार सेवा
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी येत्या ऑक्टोबरपर्यंत देशात 5G सेवा सुरू करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. त्यामुळे आता या लिलावानंतर 5G साठी जोमाने कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.