मुंबई : जागतिक स्तरावर ३ लाख ५० हजार पेक्षा जास्त कर्मचारी असलेली एक अग्रगण्य जागतिक सुविधा व्यवस्थापन कंपनी म्हणुन प्रसिद्ध असणाऱ्या आयएसएसने भारतात वाढत असलेली आउटसोर्सिंग बाजारपेठ म्हणून आपल्या वनआयएसएस (OneISS) धोरणाद्वारे भारतात विस्तार आणि ऑपरेशन्स वाढविणार असल्याची घोषणा केली. तसेच सर्वांसाठी शिक्षण आणि कौशल्य विकास हा एक महत्त्वाचा नवीन शैक्षणिक कार्यक्रम देखील जाहीर केला आहे. यात ४२ हजार पेक्षा अधिक कामगारांना अधिकृत हँडहोल्डिंग, आर्थिक सहाय्य आणि औपचारिक शिक्षण प्रमाणपत्रे आणि पदवी प्राप्त करण्यासाठी व आपला पुढील व्यवसायिक प्रवास सुखकर करण्यासाठी शैक्षणिक भगिदारीचा लाभ घेता येईल. या अंतर्गत भारतातील नवीन शिक्षण धोरणामुळे नुकतेच रोजगार क्षेत्रात प्रवेश केलेल्या आयएसएस प्लेसमेकर्सना त्यांचे १० वी आणि १२वी बोर्ड आणि पदवी पूर्ण करण्यास सक्षम केले जाईल. विद्यमान साइट व्यवस्थापकांसाठी डिप्लोमा इन फॅसिलिटी मॅनेजमेंट प्रमाणपत्र हा कार्यक्रमाचा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग (NIOS), सिम्बायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम सुकर केला जाईल.
आपल्या नेतृत्वात पहिल्यांदाच भारत भेटीवर आलेले आयएसएस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅस्पर फॅन्जेल यावेळी म्हणाले की,”सर्वांसाठी शिक्षण हा नवीन शैक्षणिक कार्यक्रम आम्ही राबविणार असून आमची पर्यावरण संदर्भात तसेच सामाजिक आणि प्रशासकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या नावीन्य, शाश्वतता आणि कौशल्यावर लक्ष केंद्रित करून भारतामध्ये अर्थपूर्ण प्रभाव पाडण्याच्या आमच्या वचनबद्धतेला हा कार्यक्रम बळकटी बळकटी देणार आहे.
कंपनीचे भारतातील प्रमुख व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अक्ष रोहतगी म्हणाले की,”आयएसएस च्या मूल्यांनुसार, आम्ही आमच्या लोकांच्या अत्यावश्यक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करून भारतामध्ये महत्त्वपूर्ण सकारात्मक सामाजिक प्रभाव पाडण्यासाठी आणि समान संधी निर्माण करण्यासाठी पुढाकार घेत आहोत. सर्वांसाठी शैक्षणिक कार्यक्रम अंतर्गत आमच्या आघाडीच्या कर्मचाऱ्यांना त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू ठेवण्यास आणि पूर्ण करण्यात मदत करेल. आम्ही सर्व स्तरांवर आमच्या प्लेसमेकर्सना सतत व्यावसायिक उत्कृष्टतेच्या नवीन शिखरांवर पोहोचण्यासाठी, मोठ्या जबाबदाऱ्यांसाठी तयार राहण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान वाढवण्या कडे आमचा कल राहणार आहे “