मुंबई :-(प्रतिनिधी) एमसीए कांगा लीग डी डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत हेरंब परब व उत्कर्ष राऊत यांची अर्धशतके आणि कुणाल गावंड ( ४५ धावांत ५ बळी) व योगेश डिचोलकर ( ३९ धावांत ५ बळी) यांची प्रभावी गोलंदाजी, यामुळे माटुंगा जिमखानाने विरारच्या आव्हर्स क्रिकेट क्लबचा पहिल्या डावातील १०४ धावांच्या आघाडीमुळे विजय मिळविला. प्रथम फलंदाजी करतांना आव्हर्स क्रिकेट क्लबचा पहिला डाव कुणाल गावंड व योगेश डिचोलकर यांच्या अचूक गोलंदाजीने अवघ्या ११२ धावांत गुंडाळला. हेरंब परब (६२ धावा), उत्कर्ष राऊत (५८ धावा), कुणाल गावंड (४३ धावा) यांच्या दमदार फलंदाजीमुळे माटुंगा जिमखान्याने ९ बाद २१६ धावांची मजल गाठली.
दुसऱ्या सामन्यात जॉन ब्राईट असोसिएशनने जॉली क्रिकेटर्सला पहिल्या डावात १३ धावांनी मागे टाकून विजय मिळविला. यश खळदकर (२५ धावांत ४ बळी) व दिनेश साळुंके (२२ धावांत ३ बळी) यांच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे जॉली क्रिकेटर्सला पहिल्या डावात ९८ धावाच नोंदविता आल्या. सुमित म्हात्रेच्या आक्रमक ६८ धावांमुळे जॉन ब्राईट असोसिएशनने ४ बाद १११ धावांसह आघाडीचा पल्ला गाठून पहिला डाव घोषित केला. एसकेपी अथेलेटिक क्लबने युनायटेड फ्रेंड्स स्पोर्ट्स क्लबचे १८९ धावांचे पहिल्या डावातील आव्हान ७ बाद १९० धावसंख्या उभारून पार केले. हिमांशू वायंगणकरने (५७ धावा) अर्धशतक ठोकले.
******************************