पॅव्हिलियनच्या संकल्पनेचा भारत व तैवान यांच्यामधील सहयोगात्मक संबंधाला चालना देत भारताच्या विकासाला गती देण्याचा मनसुबा
मुंबई, – तैवान एक्स्पो 2023 मध्ये तैवान एक्सलन्स पॅव्हेलियनचे मध्यवर्ती मंच, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, तैवान एक्सटर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (TAITRA) चे अध्यक्ष श्री. जेम्स सी. एफ. हुआंग यांच्या हस्ते शानदार उद्घाटन झाले. या वेळी बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय उपस्थित होती. शिवाय, या कार्यक्रमाला प्रमुख भारतीय उद्योग संघटनांतील प्रमुख सदस्यांनीही हजेरी लावली होती, ज्यामुळे आगामी काळात संभाव्य सहयोग आणि भागीदारींसाठी मंच तयार करण्यात आला होता. तैवान एक्स्पो 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान बीईसी, मुंबई येथे होणार आहे.
यंदाचे तैवान एक्सलन्स पॅव्हिलियन स्मार्ट टेक्नॉलॉजी, इंटेलिजण्ट हेल्थकेअर व अॅडवान्स्ड मशिनरीच्या मुख्य थीमच्या अवतीभोवती फिरते. नाविन्यतेवरील प्रमुख फोकससह ही थीम सौंदर्य, फॅशन, आरोग्य, क्रीडा, होम अॅण्ड लिव्हिंग, आयसीटी, परिवहन आणि उत्पादकता व ऊर्ज अशा श्रेणींमधील अत्याधुनिक सोल्यूशन्सची वैविध्यपूर्ण श्रेणी प्रदान करण्याप्रती तैवान एक्सलन्सच्या कटिबद्धतेला दाखवते. सर्वोत्तम उत्पादनांमध्ये बायोजेण्ड थेरपीटिक्स कं. लि.चे रेव्होकार्ट वन-स्टेप ऑटोलॉगस कार्टिलेज रिपेअर सिस्टम, आयपीईव्हीओ कॉर्पोरेशनचे टीओटीईएम १८०, एव्हरफोकस इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनचे स्मार्ट एआय मिरर, एआयएफए टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनचे i-Ctrl प्रो, हुआ-जाय (तैवान) कॉर्पोरेशनचे ऑटोमोटिव्ह स्विच, शेनोना कं. लि.चे बूस्टफिक्स यांचा समावेश आहे. या इव्हेण्टचे खास आकर्षण म्हणजे भारतात विविध जागतिक दर्जाच्या उत्पादनांचे पदार्पणीय लाँच, ज्यामधून अभ्यागतांना या इनोव्हेशन्सचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची अद्वितीय संधी देण्यात आली आहे.
पहिल्याच दिवशी तैवान एक्सलन्स पॅव्हिलियने अनेक अभ्यागतांचे लक्ष वेधून घेतले, ज्यांनी उत्सुकतेने उत्पादने व इनोव्हेशन्स पाहिले. अधिक माहिती मिळवण्याप्रती त्यांच्या उत्सुकतेने प्रबळ संबंध व अर्थपूर्ण परस्परसंवादांना चालना दिली. तसेच, उद्योग संस्था सदस्यांनी ब्रॅण्ड्सच्या प्रतिनिधींसोबत संलग्न होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला, उत्पादने व इनोव्हेशन्सचे सर्वसमावशेक परीक्षण केले, तसेच सहयोगात्मक उद्यमांसाठी शक्यतेचा शोध घेतला.
तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (टायट्रा) सोबत सहयोगाने इंटरनॅशनल ट्रेड अॅडमिनिस्ट्रेशन (टीआयटीए) द्वारे आयोजित करण्यात येणारे तैवान एक्स्पो भारत व तैवान यांच्यामधील दीर्घकालीन संबंध अधिक दृढ करण्याच्या मोठ्या उद्देशासह डिझाइन करण्यात आले आहे. तैवान एक्सलन्स या प्रख्यात इव्हेण्टच्या सर्वांगीण दृष्टीकोनाशी संलग्न आहे, तसेच या दीर्घकालीन राजकीय संबंधांमध्ये मोठे योगदान देत आहे आणि दोन्ही देशांमधील द्विपक्षीय सहयेागासाठी सक्रियपणे नवीन माध्यम विकसित करत आहे.
”तैवान एक्सलन्स पॅव्हिलियनमधून नाविन्यता व सर्वोत्तमतेचा उत्साह दिसून येतो, तसेच हा पॅव्हिलियन तैवान व भारत यांच्यामधील डायनॅमिक संबंधांना अधिक दृढ करतो. हे व्यासपीठ आहे, जेथे उल्लेखनीय संकल्पनांसोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे संयोजन केले जाते, ज्यामधून भावी संभाव्यतांची झलक पाहायला मिळते. आम्हाला माहितीची देवाणघेवाण आणि इनोव्हेशनच्या या उल्लेखनीय प्रदर्शनाच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होताना पाहण्याचा अभिमान वाटतो,” असे तैवान एक्स्टर्नल ट्रेड डेव्हलपमेंट कौन्सिल (टायट्रा)चे अध्यक्ष श्री. जेम्स सी. एफ. हुआंग म्हणाले.
तैवान एक्सलन्सने भारताच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘डिजिटल भारत’ उपक्रमांप्रती, तसेच देशाची वाढ व विकासाला गती देण्यासाठी भारतीय सरकारने सुरू केलेल्या इतर विविध उपक्रमांप्रती मोठे योगदान दिले आहे. कंपनी मोठ्या सहयोगात्मक प्रयत्नांना चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, ज्यामधून तैवान व भारत यांच्यामधील सहयोग व समन्वयाला चालना मिळते. या सहयोगाच्या माध्यमातून नाविन्यता व तंत्रज्ञान प्रकाशझोतात आणण्यावर मुख्यत्वे फोकस आहे.