मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टमधील बंधुत्व फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२३ रोजी शिवाजी पार्क, चैत्यभूमी, दादर पश्चिम येथे स्वच्छता अभियान राबविले.
शिवाजी पार्क चैत्यभूमी सागर किनाऱ्यापर्यंत जमा झालेले प्लास्टिक,थर्माकोल, निर्माल्य तसेच विविध प्रकारचा कचरा पिशव्यांमध्ये जमा करून कचरा गाडीमध्ये जमा केला. ड्युटीवर असलेले म्युनिसिपल सॅनिटरी सुपरवायझर, मुकादम व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. समुद्र किनारपट्टीवर कचरा टाकून समुद्री जैव विविधतेवर परिणाम होऊन येथील सागरी मत्स्य संपदेवर मच्छीमार बांधवांची उपजीविका अवलंबून आहे. तसेच पर्यटनाच्या दृष्टीने एक महत्वाचा भाग आहे. संस्थेचे अध्यक्ष समीर राणे यांनी सर्वांचे स्वागत केले. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे कार्याध्यक्ष डॉ.यतीन पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , स्वछता मोहीम,मेडिकल कॅम्प,ब्लड डोनेशन कॅम्प असो, सामाजिक उपक्रमामध्ये सर्व सहभागी झाले तर एक नवीन ऊर्जा मिळते. सहभागी झालेले सेवानिवृत्त कर्मचारी याना शुभेच्छा दिल्या.
स्वछता मोहीम यशस्वी करण्यासाठी समीर राणे, स्नेहा राणे,डॉ.यतीन पटेल, अरविंद जागडे, हेमंत वरळीकर, शशी नाईक, प्रकाश शिंदे, एस. डी. शिरसाठ, संजय तावडे, अशोक साबळे, संतोष नार्वेकर, गणेश वाडेकर, अरविंद लेले, विलास दिवेकर व सेवांनिवृत्त वरिष्ठ कर्मचारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला. मुंबई महानगर पालिकेतर्फे श्री. कांबळे यांनी बंधुत्व फाउंडेशनच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.