(डावीकडून उजवीकडे) बेला राजन, संस्थापक, संपर्क, रोहित बन्सल, कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख- रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, मदन बहल, सह- संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक- अॅडफॅक्टर्स पीआर, सुजीत पाटील, सह- लेखक द पर्सुएट ऑफ रेप्युटेशन, अमित प्रभू, सह- लेखक, द पर्सुएट ऑफ रेप्युटेशन, रॉजर सी. बी. परेरा, संचालक, टर्निंग पॉइंट ब्रँड कन्सलटिंग, तान्या दुबाष, कार्यकारी संचालक आणि मुख्य ब्रँड अधिकारी, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड आणि असोसिएट कंपनीज, कुणाल विजयकर, पत्रकार आणि लेखक, कार्तिका व्ही. के. प्रकाशक, वेस्टलँड बुक्स.
पुस्तकाविषयी
भारतातील सातत्याने विकसित होत असलेल्या पीआर क्षेत्रात यशस्वी कसे व्हायचे हे जाणून घ्या, थेट तज्ज्ञांकडून. जे तुम्हाला अस्थिर परिस्थितीत आजच्या काळाशी सुसंगत ब्रँड व्यवस्थापन कसे करायचे हे शिकवतील.
आजचा काळ पब्लिक रिलेशन्स क्षेत्रासाठी नवा आहे. आतापर्यंत प्रतिष्ठेला कधीच इतके महत्त्व आले नव्हते, की ती कधीच इतकी भरभरून मिळत नव्हती. विचारशीलता, पारदर्शकता आणि अस्सलपणा ही त्याचे प्रमुख घटक असले, तरी भारताच्या अनोख्या सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक वैविध्यपूर्णतेतून वाट काढणं हे उद्योन्मुख गुणवत्ता आणि अनुभवी लीडर्स अशा दोघांसाठी आव्हानात्मक झालं आहे. त्याला विविध क्षेत्रांतील नवनव्या तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. पीआर व्यावसायिकांपुढे आता एकच पर्याय आहे – स्थित्यंतर आपलेसे करणे आणि टिकून राहाणे.
द पर्सुएट ऑफ रेप्युटेशन हे पुस्तक या नव्या जगात कसं टिकून राहायचं हे सांगतं. सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, इन्फ्लुएन्सर्सचा उदय, डेटावर आधारित निर्णयप्रक्रिया आणि हक्काने मिळवलेल्या, मालकीच्या व पेड मीडिया यातील धूसर होत असलेल्या सीमा यांमुळे आपली संवादाची पद्धत मोठ्या प्रमाणावर बदलत असल्याचे वास्तव हा या पुस्तकाचा गाभा आहे. मात्र, बदलाबरोबरच नव्या संधी येतात. पीआर व्यावसायिकांना बदलाच्या या ओघात ब्रँडची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी भागधारकांना सहभागी करून घेण्यासाठी, ग्राहकांना आपलीशी वाटणारी प्रभावी कॅम्पेन्स अमलात आणण्यासाठी योग्य स्थान मिळत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी या क्षेत्रात कार्यरत असलेल्या ७५ तज्ज्ञ पीआर व्यावसायिकांनी सांगितलेले अनुभवाचे बोल या पुस्तकात वाचायला मिळणार असून त्याचबरोबर अस्थिर वातावरणात मार्ग कसा काढायचा हे सांगणारी पीआर धोरणंही यात दिलेली आहेत. पीआर व्यावसायिकांना भावनिक संवेदनशीलता, विचारशील जबाबदारी आणि पर्यावरण, सामाजिक तसेच प्रशासकीय समस्यांविषयी वाटणारा आदर यांच्या मदतीने भविष्य कसे घडवता येईल हे सुद्धा या पुस्तकात सविस्तर वाचता येईल.
काळाच्या कसोटीवर खऱ्या उतरतील अशा कंपनीची गोष्ट सांगण्यास इच्छुक असलेल्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे असे आहे.