Santosh Sakpal
मुंबई : चांदिवली येथील पुनर्वसन वसाहतीतील चौदा हजार सदनिका धारकांना मालकी हक्क मिळवा तसेच इतर अनेक वर्षापासुन प्रलंबित प्रश्ण शिंदे सरकारने तात्काळ मार्गी लावावे या मागणीसाठी महाराष्ट्र परिवर्तन सेनेच्या वतीने आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी चांदिवली पुनर्वसन वसाहत येथे सकाळी 11 वाजता धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाचे नेतृत्व पक्ष प्रमुख धनराज थोरात हे करणार आहेत. या आंदोलनात हजारो लाभार्थी सहभागी होणार असल्याचे धनराज थोरात यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
अधिक माहितीनुसार, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुनर्वसन वसाहत फार्म रोड चांदिवली अंधेरी पूर्व मधील 14 हजार सदनिका धारकांना मालकी हक्क मिळण्यासाठी शासनाने शासन परिपत्रक जारी करावे , अशी तसेच या सदनिका धारकांना 2007 ते 2024 पर्यंत कायमस्वरूपी कर माफ करण्यात यावा. ही संपूर्ण वसाहत महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी शासन परिपत्रक काढावे कै. आनंदीबाई सुर्वे उद्यानाच्या लगत डीपी प्लान प्रमाणे हिंदू स्मशान भूमि करिता शासन परिपत्रक जारी करावे तसेच भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुनर्वसन वसाहत असे नामांतर करावे अशा विविध मागण्या वसाहती मधील सदनिका धारकाच्या अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे. याबाबत राज्य शासन, महापालिका, जिल्हा तसेच एसआरए प्राधिकरण यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र हे प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. मात्र आता यावर राज्य सरकारने तत्काळ तोडगा काढून जनतेच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मागणी स्थानिक सदनिका धारकांची असून न्याय द्यावा अशी मागणी करण्यात येणार आहे.