मुंबई,: टाटा मोटर्स या भारतातील आघाडीच्या ऑटोमोबाइल उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, टियागोने ५००,००० युनिट्सच्या विक्रीचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. शेवटच्या १ लाख युनिट्सची विकी अवघ्या १५ महिन्यांमध्ये झाली आहे, ज्यामधून गतीशील व आरामदायी ड्रायव्हिंग अनुभवाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांमध्ये वाढता कल दिसून येतो. टियागोसाठी होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमधील सानंद केंद्र येथे प्रतिकात्मक सादरीकरणासह सेलिब्रेशनला सुरूवात झाली.
वर्षानुवर्षे टियागोने ४० हून अधिक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त करण्यासह लक्षवेधक डिझाइन, अपवादात्मक सुरक्षितता वैशिष्ट्ये, वैशिष्ट्य-संपन्न इंटीरिअर्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान अशा सर्वोत्तम वैशिष्ट्यांमुळे तरूण व डायनॅमिक ग्राहकांमध्ये बरीच लोकप्रियता प्राप्त केली आहे. टियागो श्रेणी पेट्रोल, सीएनजी व इलेक्ट्रिक अशा विविध पॉवरट्रेन पर्यायांमध्ये येते. तसेच टियागो एनआरजी एसयूव्ही प्रेरित डिझाइनसह ऑफ-रोडिंग क्षमतांसह येते. ही वेईकल देखील पेट्रोल व सीएनजी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. टियागोच्या नेट प्रमोटर स्कोअरला ५१ चे सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे, ज्यामधून ब्रॅण्डचे मोठे यश दिसून येते.
या उल्लेखनीय टप्प्याबाबत आपले मत व्यक्त करत टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स लि.चे विपणन प्रमुख श्री. विनय पंत म्हणाले, ‘‘टियागोने लाँच झाल्यापासून आमच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीच्या लोकप्रियतेला चालना देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. टियागोने सूक्ष्मदर्शी ग्राहकांना उत्तम स्टाइलिंग, अद्वितीय सुरक्षितता मानक, अत्याधुनिक तंत्रज्ञान देत, तसेच हॅच विभागाला नवीन आकार देत सतत अपेक्षांची पूर्तता केली आहे. ५०० हजार विक्रीचा टप्पा गाठण्यामधून टाटा मोटर्सची सर्वोत्तमतेप्रती अविरत कटिबद्धता सार्थ ठरते. आम्ही सतत पाठिंबा देणाऱ्या आमच्या निष्ठावान ग्राहकांचे मनापासून आभार मानतो. आम्हाला विश्वास आहे की टियागो न्यू फॉरेव्हर श्रेणीच्या यशामध्ये, तसेच विभागाच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.’’
टियागो ग्राहकांच्या प्रोफाइलमधून तरूण व महत्त्वाकांक्षी व्यक्तींप्रती कंपनीची कटिबद्धता दिसून येते, जेथे ग्राहकाचे सरासरी वय ३५ वर्ष आहे. टियागोची ६० टक्के विक्री शहरी बाजारपेठांमधून आहे आणि उर्वरित ४० टक्के विक्री ग्रामीण बाजारपेठांमधून आहे; यामधून विविध ग्राहक विभागांमध्ये वेईकलची व्यापक आकर्षकता दिसून येते. टियागोने महिला ग्राहकांमध्ये देखील सकारात्मक बदल पाहिला आहे, जेथे जवळपास १० टक्के विक्रीमध्ये महिला ग्राहक आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे टियागोला पहिल्यांदाच कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून व्यापक लोकप्रियता मिळाली आहे, जेथे आर्थिक वर्ष २३ मध्ये पहिल्यांदाच कार खरेदी केलेल्या ग्राहकांमध्ये टियागो खरेदी केलेले ग्राहक ७१ टक्के आहेत.
लाँच झाल्यापासून टियागोने अनेक प्रमुख मैलाचे दगड संपादित केले आहेत, ज्यामधून टाटा मोटर्सने नवीन डिझाइन तत्त्व आणि भावी मॉडेल्ससाठी मोकळा मार्ग दिसून येतो. जानेवारी २०२० मध्ये टियागोला जीएनसीएपीकडून ४-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आणि ही वेईकल विभागातील सर्वात सुरक्षित हॅच ठरली. उत्साहपूर्ण व स्मार्ट वैशिष्ट्यांसह टियागो तरूण व आनंदप्रिय ग्राहकांसाठी पसंतीची हॅचबॅक बनली आहे. टाटा मोटर्सला देशभरात ५ लाखांहून अधिक आनंदी टियागो मालकाचा टप्पा साजरा करण्याचा अभिमान वाटतो. कंपनी टियागो ब्रॅण्डला अधिक नव्या उंचीवर घेऊन जाण्याप्रती कटिबद्ध आहे.