– महिनाभर चालणारी मान्सून कॅम्पेन १ जुलै २०२३ पासून सुरू झाली आहे, जी सर्वसमावेशक कार केअर सर्विस देते, ज्यामध्ये तुमच्या फोक्सवॅगन वेईकलच्या कॉम्प्लीमेण्टरी ४०-पॉइण्ट वेईकल चेक-अपचा समावेश आहे – समाधानकारक मालकीहक्क अनुभव: फोक्सवॅगन लॉयल्टी उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स, ज्यामध्ये एक्स्टेण्डेड वॉरंटी (ईडब्ल्यू), सर्विस व्हॅल्यू पॅकेजेस् (एसव्हीपी) आणि निवडक व्हॅल्यू अॅडेड सर्विसेस् (व्हीएएस) वर ऑफर्स यांचा समावेश – फोक्सवॅगन असिस्टण्स आणि मोबाइल सर्विस युनिट (एमएसयू)च्या माध्यमातून ग्राहकांना डोअर-स्टेप सर्विस – मान्सून कॅम्पेन ऑफर्स भारतातील १२० फोक्सवॅगन सर्विस टचपॉइण्ट्सवर उपलब्ध असतील – या सर्विस ऑफरिंगसह संपूर्ण पावसाळा सीझन ग्राहकांना विनासायास ड्रायव्हिंग अनुभव
मुंबई: फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाने आज भारतातील १२० सर्विस टचपॉइण्ट्सवर त्यांच्या ग्राहकांसाठी वार्षिक ‘मान्सून कॅम्पेन’ कार केअर सर्विस उपक्रमाची घोषणा केली. महिनाभर चालणारी कॅम्पेन १ जुलै २०२३ पासून सुरू
झाली असून ग्राहकांना सर्वसमावेशक सेवा देईल.
मान्सून कॅम्पेन उपक्रमांतर्गत ग्राहकांना प्रशिक्षित प्रोफेशनल्सकडून कॉम्प्लीमेण्टरी ४०-पॉइण्ट चेक-अपचा लाभ घेऊ शकतात. याअंतर्गत कोणतेही संभाव्य ब्रेकडाऊन्स टाळण्यासाठी आणि सुलभ आरामदायी ड्राइव्ह अनुभवाच्या खात्रीसाठी कोणत्याही विद्यमान किंवा संभाव्य मेन्टेनन्स व रिपेअर सर्विसेसकरिता वेईकलची तपासणी करण्यात येईल.
फोक्सवॅगन पॅसेंजर कार्स इंडियाचे ब्रॅण्ड संचालक आशिष गुप्ता म्हणाले, ‘‘जबाबदार ब्रॅण्ड म्हणून आमचा ग्राहकांना सुलभ, आरामदायी व आनंददायी ड्रायव्हिंग अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. अॅक्सेसिबल सर्विस, ग्राहक केंद्रित्व व त्रासमुक्त मालकीहक्क हे आमच्या उपक्रमांचे तत्त्व आहे. मान्सून कॅम्पेनच्या माध्यमातून आमचा मान्सूनपूर्व मेन्टेनन्स केअरचे महत्त्व पुन्हा सांगण्याचा मनसुबा आहे, जे मान्सून सीझनमधील खडतर ड्रायव्हिंग स्थिती पाहता ग्राहक व वेईकलच्या सुरक्षिततेची खात्री घेण्यासाठी आवश्यक आहे.’’