~ फिनिक्स मार्केटसिटी, कुर्लामध्ये उघडणार पहिले दालन ~
मुंबई, : जपानमधील सर्वात मोठा कपड्यांचा ब्रँड यूनिक्लो मुंबईतील आपल्या पहिल्या स्टोअर लॉन्चसह भारतातील आपली उपस्थिती मजबूत करण्यासाठी सज्ज झाला आहे. ६ ऑक्टोबर २०२३ रोजी फिनिक्स मार्केटसिटी, कुर्ला येथे यूनिक्लोचे मुंबईतील पहिले स्टोअर सुरु करण्यात येणार असून मुंबई आणि परिसरातील ग्राहकांना युनिक्लोचे कपडे येथून खरेदी करता येतील.
यूनिक्लो इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी टोमोहिको सेई म्हणतात, “ऑक्टोबरमध्ये युनिक्लोला भारतात चार वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबईत एक नवीन स्टोअर उघडून, आम्ही या विशाल देशाच्या कानाकोपऱ्यात आमचा ब्रँडप्रस्थापित करण्यास उत्सुक आहोत. मुंबईकर यापूर्वी यूनिक्लोच्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून कपडे मागवत होते पण त्यांना आता प्रत्यक्ष स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करता येईल.”
फिनिक्स मार्केटसिटी, कुर्ला येथे ऑक्टोबरमध्ये उघडणारे यूनिक्लो स्टोअर हे ब्रँडचे भारतातील ११ वे स्टोअर असेल. या स्टोअरच्या माध्यमातून युनिक्लो आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे कपडे उपलब्ध करून देईल. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत, या स्टोअरमध्ये प्रत्येकासाठी काही ना काही असेल.
यूनिक्लो मुंबईतील ग्राहकांना लाइफवेअरसह नवीन खरेदीचा अनुभव देणार आहे – कंपनी प्रत्येकाच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी डिझाइन केलेले कपडे ऑफर करेल. लाइफवेअर हे साधे, उच्च-गुणवत्तेचे, दैनंदिन पोशाख, विचारपूर्वक डिझाइन केलेले आणि जीवनाच्या गरजांनुसार सतत विकसित होत आहे. लाइफवेअर हे उच्च दर्जाचे दैनंदिन साधे पोशाख आहे, बदलत्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विचारपूर्वक डिझाइन केलेले आहे.
आज, यूनिक्लोची जगभरात २,४०० हून अधिक स्टोअर्स आहेत. यूनिक्लोचे पहिले स्टोअर १९८४ मध्ये जपानच्या हिरोशिमा शहरात उघडले. यूनिक्लो येथे उपलब्ध असलेले कपडे जपानच्या मूलभूत तत्त्वांचे प्रतिबिंबित करतात. या ब्रँडचे कपडे जितके आकर्षक आहेत तितकाच त्यांचा साधेपणाही समोर येतो. ही एक कंपनी आहे जी ग्राहकांच्या सोयी आणि सोईला अग्रस्थानी ठेवते.