रुग्ण केंद्रीकरणावर आणि उत्पादन आणि गुणवत्तेच्या भविष्यावर लक्ष केंद्रीकरण
मुंबई, : इंडियन फार्मास्युटिकल अलायन्स (आयपीए-IPA)ने आज ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी समिटच्या आठव्या आवृत्तीचा यशस्वीरित्या समारोप केला. भारत सरकारचे माननीय रसायन आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, डॉ. मनसुख मंडाविया यांनी समारोप समारंभात आपले भाषण दिले. या परिषदेची थीम, ‘रुग्ण केंद्रीकरणः उत्पादन आणि गुणवत्तेचा नवीन नमुना’ अशी होती. या दोन दिवसीय शिखर परिषदेत उद्योग नेते, जागतिक नियामक, दर्जेदार तज्ञ आणि भागधारक हे, ज्ञान देवाणघेवाण वाढविण्यासाठी आणि भारतातील फार्मास्युटिकल लँडस्केपला आकार देण्यासाठी महत्त्वाच्या क्षेत्रांवर चर्चा करण्यासाठी एकत्र आले.
टोरेंट फार्मास्युटिकल्सचे चेअरमन आणि आयपीए (IPA)चे प्रेसिडेंट, समीर मेहता यांनी या कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फार्मास्युटिकल विभाग, भारत सरकारच्या सचिव सुश्री एस. अपर्णा यांनी उद्घाटन सत्रात मुख्य भाषण दिले. पहिल्या दिवशी, फार्मास्युटिकल उद्योगात एक संस्कृती म्हणून उत्पादन आणि गुणवत्ता निर्मितीच्या भविष्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. जगभरातील नियामक – यूएस एफडीए (US FDA), एमएचआरए (MHRA), ईडीक्यूएम (EDQM) आणि सीडीएससीओ (CDSCO) यांनी अलीकडील तपासणी टिप्पण्या आणि ट्रेंडवर प्रकाश टाकणाऱ्या नियामक बाबींवर चर्चा केली. फार्मास्युटिकल उत्पादनमध्ये उत्कृष्टता सुनिश्चित करण्यासाठी श्रेणीतील सर्वोत्तम अभियांत्रिकी नियंत्रणांचा शोध घेत, तंत्रज्ञान आर्किटेक्चरवरील चर्चेसह हा दिवस संपन्न झाला.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उद्योगातील प्रगती, सतत उत्पादन, नियामक अपेक्षा, फार्मास्युटिकल उत्पादनात डिजिटल तंत्रज्ञान आणि इतर उद्योगांकडून शिकणे या बाबींवर उद्योग नेत्यांनी प्रकाश टाकला. या दिवसाची खासियत ही होती की, या परिषदेत सिप्ला (Cipla), डॉ. रेड्डीज (Dr Reddy’s), ल्यूपिन (Lupin), सन फार्मा (Sun Pharma) आणि झायडस (Zydus) या फार्मास्युटिकल उद्योगांच्या प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाच्या भविष्याबाबत आपले विचार मांडले.
माननीय रसायन आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, भारत सरकार, डॉ. मनसुख मंडाविया म्हणाले, “गुणवत्ता, संशोधन आणि विकास आणि नाविन्य ही काळाची गरज आहे. कोविड-19 दरम्यान भारत देश मिशन मोडमध्ये
होता आणि आम्ही जगाला दर्जेदार औषधे आणि लसींचा अखंड पुरवठा सुनिश्चित करून जगाची फार्मसी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जागतिक संकटात भारताने परिपक्वता, जबाबदारी आणि नेतृत्व प्रदर्शित केले. मला आनंद आहे की, सरकार आणि भागधारकांच्या सहकार्यामुळे भारताची जागतिक प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. मी आमच्या फार्मा उद्योगातील अशा लीडर्सचे देखील मनापासून कौतुक करतो ज्यांनी कर्तव्याला नफ्यापेक्षा जास्त स्थान दिले आणि देशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी चार नवीन कोविड लसी तयार करण्यासाठी सरकारसोबत काम केले. आता बदलाची वेळ आली आहे. आज जगाची इच्छा आहे की, भारताने औषधे आणि लसी तयार कराव्यात आणि आम्ही आमच्या ब्रँड शक्तीचा आणि मनुष्यबळाचा वापर करून या अनोख्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. आज गुणवत्तेला सर्वोच्च प्राधान्य आहे आणि हे
सुनिश्चित करण्यासाठी केंद्र आणि राज्य नियामक जवळून काम करत आहेत. नवोन्मेषाला चालना देण्यासाठी आणि उद्योग-शैक्षणिक संबंध मजबूत करण्यासाठी आपण सहयोग करू आणि नवीन मॉडेल तयार करू. मला आशा आहे की, ग्लोबल फार्मास्युटिकल क्वालिटी समिट 2023मध्ये गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेमुळे आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन मार्ग सापडतील आणि सल्लामसलत हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे.”
इंडियन फार्मास्युटिकल अलायन्सचे सरचिटणीस सुदर्शन जैन म्हणाले, “जागतिक स्तरावर रुग्णांच्या आरोग्याच्या परिणामांना आकार देण्यात भारतीय फार्मास्युटिकल उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. भारत जगभरात दर्जेदार किफायतशीर औषधे पुरवण्यासाठी ओळखला जातो. कोविड -19 (COVID-19) महामारीच्या काळात, या उद्योगाने लवचिकता दर्शविली आणि आता त्या जगाची फार्मेसी म्हणून ओळखले जाते. गुणवत्ता हा फार्मास्युटिकल क्षेत्राचा मूलभूत सिद्धांत आहे. प्रणाली, तंत्रज्ञान आणि प्रतिभा या बाबींच्या गुणवत्तेत सतत गुंतवणूक मूलभूत आहे, कारण संपूर्ण आरोग्यसेवा लँडस्केप अभूतपूर्व वेगाने विकसित होत आहे. आयपीए (IPA), भारताला गुणवत्तेत जागतिक मानदंड बनवण्यासाठी वचनबद्ध आहे.”