मुंबई, : मुंबई उपनगर जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने पार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल येथे क्रीडा पत्रकारांसाठी आयोजित केलेल्या टेबल टेनिस स्पर्धेत अभिजीत कुलकर्णीला दुहेरी मुकुटाचा मान मिळाला. एकेरीत त्याने अमोल कऱ्हाडकरवर ११-६ , १०-१२, आणि ११-४ अशी मात केली तर दुहेरीत त्याने अमित कामत याच्या साथीने अमोल कऱ्हाडकर आणि संतोष बने या जोडीला १२ -१०, ६ -११, आणि ११-७ असे तीन गेम मध्ये पराभूत करून स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले.
एकेरीत अभिजीत कुलकर्णी याने उपांत्य फेरीत गॉर्डन डिकॉस्टा याचे आव्हान ११ – ७ , ११ – ८ असे परतवून लावले तर अमोल कऱ्हाडकर याने उपांत्य फेरीत शेरवीन क्रास्टो याला ९ -११ , ११ -२ , ११ -४ असे हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. दुहेरीतील उपांत्य फेरीत कुलकर्णी आणि कामत या जोडीने गॉर्डन डिकॉस्टा आणि एथिराम अली या जोडीला ११ -५, ११ -७ असे हरविले तर अमोल कऱ्हाडकर- संतोष बने या जोडीने शेरवीन क्रास्टो आणि विजय बने या जोडीला ११ -८, ११ -६ असे नमवून अंतिम फेरी गाठली होती.
निकाल – एकेरी – उपांत्य फेरी –
अमोल कऱ्हाडकर वि. वि. शेरवीन क्रास्टो ९-११, ११ -२ , ११ -४;
अभिजीत कुलकर्णी वि. वि. गॉर्डन डिकॉस्टा ११-७ , ११-८.
अंतिम फेरी – अभिजीत कुलकर्णी वि.वि. अमोल कऱ्हाडकर ११-६, १०-१२, ११-४ .
दुहेरी : उपांत्य फेरी –
अभिजीत कुलकर्णी- अमित कामत वि.वि. गॉर्डन डिकॉस्टा – एथिराम अली – ११-५, ११-७.
अमोल कऱ्हाडकर-संतोष बने वि.वि. शेरवीन क्रास्टो – विजय बने ११-८, ११-६.
अंतिम फेरी – अभिजीत कुलकर्णी- अमित कामत वि.वि. अमोल कऱ्हाडकर-संतोष बने – १२-१०, ६-११, ११-७.