मुंबई : Infinix ने भारतात Infinix Note 30 5G या बजेट स्मार्टफोनचे अनावरण आज केले. मुंबई येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत या बजेट फोन चे अनावरण करण्यात आले. फोनमध्ये पंच होल कटआउट, ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि जेबीएल इन-बिल्ट ड्युअल स्टीरिओ स्पीकर आहेत. विशेष म्हणजे या फोनची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे.
Infinix Note 30 5G च्या 4GB + 128GB मॉडेलसाठी तुम्हाला १४ हजार ९९९ रुपये मोजावे लागतील. तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत १५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. Axis Bank क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला १ हजारची तात्काळ सवलत मिळणार आहे. हा फोन ब्लॅक, ऑरेंज आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येतो. २२ जून रोजी दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट ऑनलाइनद्वारे हा फोन तुम्हाला घेता येईल अशी भारतातील माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिश कुमार यांनी दिली .
यासोबतच सेल्फी स्नॅपरसाठी पंच-होल कटआउट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट आहे.
फोनची मीडियाटेक डायमेंसीटी 6080 SoC आहे. तसेच 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB UFS3.1 स्टोरेज आहे. फोनमध्ये 8जीबी अतिरिक्त व्हर्च्युअल रॅम सपोर्ट असल्याने तुम्हाला मल्टीटास्किंगचा चांगला अनुभव मिळू शकणार आहे. Infinix Note 30 5G कॅमेरा आणि बॅटरी
Infinix फोनच्या मागील बाजूस 108MP प्राथमिक कॅमेरा, 2MP डेप्थ युनिट आणि AI लेन्ससह तिहेरी कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी, समोर एक 16MP शूटर आहे. यामुळे तुम्हाला स्पष्ट आणि तपशीलवार सेल्फी काढण्यात मदत मिळेल.
5,000mAh ची बॅटरी आणि 45W जलद चार्जिंग सपोर्टमुळे तुम्हाला फोन जास्त तास वापरता येईल. यासह, कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 802.11ac, ब्लूटूथ 5.1, GPS/ GLONASS आणि यूएसबी टाइप सी पोर्ट देण्यात आला आहे.