(85.23% महिलांमध्ये 3 महिन्यांच्या आत ओव्हलेशन झाले)
मातृत्वाचे वरदान प्राप्त करण्यामध्ये महिलांसाठी पुराव्यावर आधारित आणि सुरक्षित सोबती बनले
– डॉ. आरती पाटील, डॉ. दिव्या सी. एस. आणि डॉ. गौरी मोरे ह्यांचा “नोव्हलेशनमुळे पीडित स्त्रियांमध्ये ओव्हलेशनला चालना देणा-या कृतीसाठी आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जीवचे वैद्यकीय मूल्यमापन” संशोधन प्रबंध युरोपियन जर्नल ऑफ फार्मासुटीकल अँड मेडीकल रिसर्चमध्ये प्रकाशित
– गायनोवेदाचे आयुर्वेदिक सप्लीमेंट वेळेवर ओव्हलेशन होण्यामध्ये प्रभावी आढळले व पीसीओएस, अनियमित पाळी इ. स्त्रीरोगशास्त्रीय विकारांशी संबंधित वंध्यत्वाच्या व्यवस्थापनामध्ये उपयोगी ठरू शकते
– कोणतेही विपरित परिणाम न होता हे उत्पादन सुरक्षितसुद्धा आढळले
– गायनोवेदाच्या आयुर्वेदिक सप्लीमेंटमध्ये 85.23% इतके यशाचे प्रमाण मिळाले व 149 सहभागींपैकी 127 जणींमध्ये उशीरात उशीरा 90 दिवसांमध्ये ओव्हलेशन झाले
– आयुर्वेदाचे सामर्थ्य वापरून महिलांच्या आरोग्य देखभालीमध्ये लक्षणीय परिणाम साध्य करणा-या व पुराव्यावर आधारित वैद्यकीय प्रणालीद्वारे भारतातील महिलांचे सक्षमीकरण करण्याच्या गायनोवेदाच्या व्हिजनला हे वैद्यकीय अध्ययन समर्थन देते
नवी दिल्ली, 11 मे 2023: Gynoveda.com, ह्या आयुर्वेदावर आधारित महिलांच्या आरोग्य देखभाल ब्रँडने वंध्यत्व असलेल्या महिलांसाठी लक्षणीय अशी मजल गाठली आहे. युरोपियन जर्नल ऑफ फार्मासुटीकल अँड मेडीकल रिसर्चमध्ये द्वारे मान्यताप्राप्त त्यांचे आयुर्वेदिक सप्लीमेंट वेळेवर ओव्हलेशन होण्यामध्ये मदत करण्यासाठी प्रभावी आढळले गेले आहे आनि अशा प्रकारे ते पीसीओएस, अनियमित पाळी इ. स्त्रीरोगशास्त्रीय विकारांशी संबंधित वंध्यत्वाच्या व्यवस्थापनामध्ये उपयोगी ठरू शकते. भारतातील केरळमधील धन्वंतरी आयुर्वेदा केंद्र, पलक्कड येथे 149 सहभागींमध्ये झालेल्या (वयोगट 25- 35 वर्षे) ह्या अभ्यासामध्ये 85.23% महिलांनी गायनोवेदाचे आयुर्वेदिक सप्लीमेंट घेतल्यानंतर त्यांचे ओव्हलेशन
वेळेवर झाले (3 महिन्यांच्या आत). तसेच, कोणताही विपरित परिणाम आढळला नाही व ह्या महिलांना सुरक्षित मातृत्व अनुभवण्याची संधी मिळाली.
गायनोवेदाच्या मुख्य डॉक्टर, सह- संस्थापिका व आर अँड डी प्रमुख डॉ. आरती पाटील (एमडी, आयुर्वेद स्त्रीरोगशास्त्र) ह्यांनी ह्या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनच्या अभिनव यशाबद्दल बोलताना म्हंटले, “पीसीओएस, फायब्रॉईड, वंध्यत्व आणि एंडोमेट्रिओसिस अशा गंभीर स्त्रीरोगशास्त्रीय विकारांनी पीडीत असलेल्या महिलांवरील उपचारांच्या 15 वर्षांच्या अनुभवासह मी व माझ्या टीमने ह्या विकारांना दूर करून नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यामध्ये सहाय्य करू शकणा-या असाधारण आयुर्वेदिक सप्लीमेंटला विकसित केले आहे. ह्याचा आम्हांला अतिशय आनंद होत आहे.”
गुंतागुंतींवर मात करून नैसर्गिक गर्भधारणा साध्य करण्यामध्ये हजारो महिलांना सामर्थ्य देण्यामध्ये गायनोवेदाचे आयुर्वेदिक सप्लीमेंट उपयोगी ठरले आहे. मातृत्वाचे वरदान प्राप्त करण्यामध्ये महिलांची मदत करणा-या व महिलांच्या सक्षमीकरणाचे उद्दिष्ट असलेल्या गायनोवेदाचे ह्या संशोधन प्रबंधाने समर्थन केले आहे.
देशभरामध्ये महिलांनी उत्साहासह त्यांच्या सफलतेच्या कहाण्या शेअर केल्या आहेत व मातृत्वाच्या त्यांच्या वाटचालीमध्ये गायनोवेदाच्या परिणामकारकतेला त्यांनी अधोरेखित केले आहे.
मुंबईच्या चेतना जैन ह्यांनी म्हंटले, “गायनोवेदाच्या 3x कार्यक्रमामध्ये आहार, औषधे आणि डॉक्टरांचे सहाय्य ह्यांचा समावेश होता. आणि ह्या सर्वंकष योजनेमुळे मला सफल गर्भधारणेच्या माझ्या वाटचालीमध्ये मला मदत झाली. आयुर्वेदाकडे येण्यापूर्वी मी आयव्हीएफचा पर्याय निवडला होता, पण त्यातून मला अपेक्षित असलेला परिणाम मिळाला नाही. शेवटचा पर्याय म्हणून मी गायनोवेदाच्या आयुर्वेदिक सप्लीमेंटचा अंगीकार माझ्या दैनंदिन क्रमामध्ये केला व त्यामुळे मला नैसर्गिक प्रकारे गर्भधारणा करता आली आणि निरोगी बाळाला जन्म देता आला.”
तसेच, ह्या अभ्यासातून समोर आले आहे की, 123 महिलांमध्ये (82.55%) अनियमित मासिक पाळीच्या तक्रारी होत्या व 98 महिलांमध्ये त्याही सुरळीत झाल्या. औषधाचा कोणताही विपरित परिणाम झाला नाही व अभ्यासातील उत्पादन हे सहजपणे शरीराद्वारे स्वीकारले गेले होते.
गर्भधारणा होणे असाध्य आहे, असे सांगूनही ज्या महिलांनी आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी खूप वेळ दिला होता व साधने वापरून बघितली होती, त्यांचेही मातृत्वाचे अपुरे स्वप्न गायनोवेदाच्या आयुर्वेदिक सप्लीमेंटमुळेच साकार होऊ शकले. आपल्या सततच्या प्रयत्नांद्वारे गायनोवेदा महिलांना आणि आगामी महिलांना सक्षम करते व त्यांचे मातृत्व सेलिब्रेट करते.