पीएसजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत सहयोगाने सुगुणा फूड्सची कृषी-अन्न क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी रूरल मार्केटिंग कॉन्टेस्ट
MUMBAI/NHI : भारतातील सर्वात मोठे पोल्ट्री समूह सुगुणा फूड्सने पीएसजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटसोबत सहयोगाने रूरल मार्केटिंग कॉन्टेस्ट ‘सुगुणा फीड्स इनोव्हेटिव्ह इंटलेक्ट्स’ आयोजित केली होती. १८ व १९ एप्रिल आयोजित करण्यात आलेल्या दोन-दिवसीय इव्हेण्टला देशभरातील विविध महाविद्यालयांमधून ७५ हून अधिक प्रवेशिका मिळाल्या. सुगुणा फूड्समधील फीड सेल्स अॅण्ड मार्केटिंगचे श्री. मुरली जीएम आणि पीएसजीआयएमच्या विपणन विभागाचे प्रमुख डॉ. अरूल राजन यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, थियागराजर स्कूल ऑफ मॅनेजमेंट (टीएसएम) मदुराई आणि पीएसजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट या संस्थांमधील विजेत्यांना पुरस्कार देत या इव्हेण्टचे समापन झाले. व्हीआयटी स्कूल ऑफ बिझनेस, वेलोरेला अद्वितीय व कल्पनेपलीकडील संकल्पनेसाठी सर्वोत्कृष्ट सादरीकरणाचा पुरस्कार देण्यात आला.
या अद्वितीय इव्हेंटने ग्रामीण विपणन बारकावे आणि कृषी-अन्न क्षेत्राची व्यापकता समजून घेण्यासाठी योग्य व्यासपीठ प्रदान केले, विशेषत: पशुखाद्यांवर लक्ष केंद्रित केले. संवादात्मक सत्रे व पॅनेल चर्चांचा समावेश असलेल्या या इव्हेण्टमुळे कृषी-अन्न उद्योग आणि भारताच्या अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता वाढली. प्राप्त झालेल्या एकूण प्रवेशिकांमधून १५ प्रवेशिका निवडण्यात आल्या, त्यानंतर उत्साही विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्ण भव्य अंतिम फेरीत एकमेकांचा सामना केला आणि त्यामधून अंतिम ३ विजेत्यांची निवड करण्यात आली. विजेत्या संघांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना ट्रॉफी व सुगुणा फूड्सच्या सुगुणा फीड्स विभागासोबत इंटर्नशिप प्रोग्राम्स मिळाले.
‘‘आम्हाला सुगुणा फीड्स इनाव्हेटिव्ह इंटलेक्ट्स कॉन्टेस्टसाठी मिळालेला अविश्वसनीय प्रतिसाद पाहून आनंद होत आहे,’’ असे सुगुणा फूड्समधील फीड सेल्स अॅण्ड मार्केटिंगचे श्री. मुरली जीएम म्हणाले. ‘‘इव्हेण्टला मोठे यश मिळाले आणि आम्ही सर्व उपस्थित, प्रवक्ते व सहयोगींचे आभार मानतो, ज्यांच्यामुळे हे यश शक्य झाले. कनेक्ट होण्यास, संकल्पना शेअर करण्यास आणि नवीन ट्रेण्ड्सबाबत जाणून घेण्यास उत्साहित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम व्यासपीठ प्रदान करण्याचा आमचा मनसुबा होता आणि आम्ही यशस्वीपणे हे ध्येय साध्य केले. मी काही सर्वोत्तम व्यावहारिक सोल्यूशन्स सादर करण्यासाठी सर्व सहभागी व विजेत्यांचे अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की, यामुळे भविष्यात कृषी-अन्न उद्योगामध्ये क्रांतिकारी बदल घडून येतील.’’